काय सांगता ! होय, चक्क मेलेल्या कुत्र्याचं मांस खाताना दिसला तरूण (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाचे थैमान सुरू असल्यामुळे चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे मजूरांचा कामधंदा गेल्यामुळे त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची आभाळ होऊ लागली. त्यामुळे मजूर आणि हातावर पोट असणार्‍या परप्रांतीयांनी मूळ गावची वाट धरली. रस्त्याने पायी जाणार्‍या मजुरांचे हाल कसे होत आहेत याचे भीषण वास्तव दिवसेंदिवस अधिक समोर येत आहे. सरकारकडून आणि सामाजिक संस्थांकडून मिळणारी मदतही अपुरी पडते की काय हे असे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लक्षात येते. अंगावर काटा आणणारा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हिडीओमध्ये रस्त्यावरील अपघातात मेलेल्या कुत्र्याचे मांस खाताना तरुण दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली आहे.

हा व्हिडीओ पाहून तरुणाचे होत असलेले हाल आणि पायी जाणार्‍या तरुणाचे भोग काय आहेत हे सांगणारा आहे. प्रधुम्न सिंह नरुका याने हा व्हिडीओ अपलोड केला आहे. जयपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर दिल्ली-जयपूर-अजमेर बायपासचा हा व्हिडिओ आहे. प्रधुम्न यांनी या तरुणाची चौकशी केली. या तरुणाला नीट काही सांगता येईना. या तरुणाकडे पाहून तो मनोरुग्ण आहे असे वाटत नव्हते. पण भुकेमुळे त्याची अवस्था खूप खराब झाल्याचे दिसून आले. त्यांनी तरुणाला बाजूला बोलवून खायला देउन घटनेची संपूर्ण माहिती पोलिसांना दिली आहे. तरुणाचा शोध सुरू आहे. हा मजूर आहे की मनोरुग्ण याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.