2 वर्षापुर्वी बेपत्ता झालेले वडिल TikTok मुळं ‘लॉकडाऊन’मध्ये सापडले

पोलिसनामा ऑनलाईन टीम – टिकटॉकवरील व्हिडीओमुळे तब्बल दोन वर्षांनंतर बेघर झालेल्या 55 वर्षीय वृद्ध व्यक्तीला पुन्हा त्याचे घर मिळाले आहे. लॉकडाऊनमध्ये एका व्हिडीओमुळे वृद्ध व्यक्तीला घर आणि मुलाला आपले हरवलेले वडील मिळाल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणा इथल्या कोठागुडमधील रोद्दम पेद्दीराजू या तरुणासाठी टिकटिक व्हिडीओ देवदूतासारखा धावून आला आहे. एप्रिल 2018 रोजी वडील कामाच्या शोधात शेजारच्या गावात जातो असे सांगून जे बाहेर पडले ते पुन्हा परतलेच नाहीत. रोद्दमने त्यांना शोधण्याचा खूप प्रयत्न केला मात्र काहीच थांगपत्ता न लागल्याने अखेर आशा सोडली. पण एका व्हिडीओने त्यांची भेट पुन्हा वडिलांना करून दिली आहे.

पंजाबच्या लुधियाना इथे कॉन्स्टेबल अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनदरम्यान गरजुंना मदत करतानाचा एक व्हिडीओ तयार करण्यात आला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून 2 हजार किती दूर तेलंगणात रोद्दम पर्यंत पोहोचला आणि त्याला  वडील दिसले. 2 वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या बाप-लेकाची या व्हिडीओमुळे पुन्हा भेट झाली. रोद्दमचे वडील 2 वर्षांपूर्वी कामासाठी निघाले होते. त्यांना ट्रकमध्ये झोप लागल्याने उतरायचे लक्षात आले नाही.

ट्रक ड्रायव्हरने जेव्हा उतरवले त्यानंतर त्यांना चुकल्याचे लक्षात आले. भाषा समजत नाही आणि शिक्षण नसल्याने त्यांना कुणाला काही नीट सांगताही येत नव्हते. पंजाबच्या लुधियाना इथे ते रस्त्याच्या ब्रिजखाली राहात होते. लॉकडाऊनमध्ये जेव्हा पोलीस कॉन्स्टेबलने त्यांना खाण्यासाठी मदत केली तेव्हा त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि ताटातूट झालेल्या रोद्दम आणि त्याच्या वडिलांची भेट होणे शक्य झाले आहे.