Coronavirus Lockdown : अमेरिकेतून आला माजी राज्यपालांचा मुलगा, वडिल अंशुमन सिंह यांनी विमानतळावरूनच परत पाठवलं

प्रयागराज : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. असे असतानाही काही लोक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. दरम्यान, प्रयागराजमध्ये माजी राज्यपाल न्यायमूर्ती अंशुमन सिंह यांनी आपल्या मुलाला विमानतळावरून परत पाठवले आहे. अंशुमन सिंह यांचा मुलगा अमेरिकेहून भारतात आला होता. अंशुमन सिंह हे राजस्थानसह गुजरातचे राज्यपाल होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे पालन करून नेत्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

लॉकडाऊनमध्ये घरामध्ये न थांबता विनाकारण घराबाहेर फिरत आहेत, अशा नागरिकांसाठी न्यायमूर्ती अंशुमन सिंह यांनी योग्य निर्णय घेऊन बाहेर फिरणाऱ्यांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. असे असले तरी काही लोक आपल्या गावी परतण्यासाठी चालत निघाले आहेत. चालत घराकडे परतणाऱ्या नागरिकांनी ज्या ठिकाणी आहात त्याच ठिकाणी रहावे असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. आपला जीव वाचवण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. पायी जाणाऱ्या नागरिकांसाठी समाजसेवी संस्थांनी आणि नागरिकांनी त्यांना मदत करावी असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे.

लॉकडाऊनचे उल्लंघन होऊ नये, कोरोनाच्या संक्रमणाचा धोका निर्माण होऊ नये यासाठी माजी राज्यपाल न्यायमूर्ती अंशुमन सिंह यांनी अमेरिकेतून आलेल्या आपल्या मुलाला चेन्नई विमानतळावरून परत पाठवले आहे. त्यांच्या मुलाने भारतात येण्यासाठी सहा महिन्यापूर्वी विनाच्या तिकिटाचे बुकिंग केले होते. त्यांच्या मुलालने 19 मार्च रोजी अमेरिकेतून विमानाने उड्डाण केले आणि 20 मार्च रोजी चेन्नई येथे पोहचले. यानंतर त्यांच्या मुलाने वडिल अंशुमान यांच्याशी संपर्क साधाला. त्यांनी प्रयागराज येथील आपल्या घरी येण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, न्ययमूर्ती अंशुमन सिंह यांनी घरी येण्यास नकार देत त्याला पुन्हा अमेरिकेला जाण्यास सांगितले. त्यानंतर त्यांचा मुलगा आपल्या परिवारासोबत 20 मार्चला चेन्नई येथून दिल्ली आणि तेथून पुन्हा अमेरिकेला रवाना झाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like