… तर मी केवळ पाण्याच्या बाटल्या देत राहिलो असतो : शेन वॉटसन

पोलिसनामा ऑनलाईन टीम – गेल्या वर्षी माझी कामगिरी चांगली झाली नव्हती, पण कर्णधार धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी माझ्यावर विश्वास दाखवला. त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. इतर कोणत्याही दुसर्‍या संघात असतो, तर थेट संघाबाहेरचा रस्ता दाखवला असता आणि इतर खेळाडूंना पाणी नेण्यासाठी सांगितले असते असे शेन वॉटसनने सांगितले आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यासंदर्भात चाललेल्या चर्चेवेळी त्याने हे सांगितले आहे.

कोरोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. लवकर क्रीडा स्पर्धा सुरू व्हाव्यात आणि नवोदित खेळाडूंना संधी मिळावी, अशी भावना सर्व क्रीडापटूंच्या मनात आहे. भारतीय खेळाडूंसोबतच परदेशी खेळाडू हळूहळू आयपीएलआयोजनाचा आग्रह धरताना दिसत आहेत. वॉटसन म्हणाला, मी फलंदाजी चांगली करत होतो, पण मला धावा काढता येत नव्हत्या. असे बर्‍याच सामन्यांमध्ये झाले होते. काही सामन्यांनंतर तर मला पण वाटू लागले की मला आता बाकावर बसावे लागणार. पण त्यांनी मला अजिबात संघाबाहेर केले नाही.

मला संधी देत राहिले आणि अखेर अंतिम सामन्यात माझी कामगिरी चांगली झाली. माझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे मी संघाला गरज असताना चांगली कामगिरी करू शकलो. असे नेृतत्वकौशल्य असणे आवश्यक असल्याचे त्याने सांगितले. धोनी आणि स्टीफन फ्लेमिंग या दोघांचा मी आयुष्यभर ऋणी राहिन, असेही वॉटसनने नमूद केले.