Coronavirus Lockdown : किंग खान शाहरूखनं BMC कडे सोपवलं 4 मजली ऑफीस, महिला आणि वृध्दांसाठी बनवलं ‘क्वारंटाईन’ सेंटर

पोलीसनामा ऑनलाईन :बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी त्यांची 4 मजली इमारत बीएमसीला सोपवली आहे. शाहरुखनं ही इमारत क्वारंटाईन सेंटर बनवण्यासाठी देऊ केली आहे. इथं लहान मुल, महिला किंवा वृद्धांना क्वारंटाईनमध्ये ठेवलं जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेनं आपल्या ट्विटरवरून ट्विट करत लिहलं की, “आम्ही शाहरुख खान आणि गौरी खान यांचे आभार मानतो. ज्यांनी आपली 4 मजली(ऑफिस इमारत) आम्हाला मदत करण्यासाठी म्हणून दिली आहे. ही इमारत सर्व सुविधांनी युक्त आहे. ही इमारत आता मुलं, महिला आणि वृद्धांना क्वारंटाईन करण्यासाठी वापरली जाणार आहे. ही मदत विचारशील असून वेळेवर मिळाली आहे.”

BMCचं हे ट्विट समोर आल्यानंतर आता सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. ट्विटरवर पुन्हा एकदा शाहरुखचं कौतुक होत आहे. शाहरुखनं केलेल्या मदतीनंतर लगेचच ट्विटरवर #srkofficeforquarantine हा हॅशटॅग ट्रेंड करताना दिसत आहे.

शाहरुखच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर असं बोललं जात आहे की राजकुमार हिरानी यांच्या आगामी प्रोजेक्टमध्ये तो दिसणार आहे. परंतु याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. वर्षभरापासून तो मोठ्या पडद्यापासून लांब आहे. 2018 मध्ये तो झिरो सिनेमात शेवटचा दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही.

https://twitter.com/BrijwaSrk/status/1246315024630472704