Coronavirus Lockdown : ‘या’ रेसिपीव्दारे तयार करा रोगप्रतिकार ‘शक्तीवर्धक’ चहा, जाणून घ्या

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे जग हदरले आहे, देशात देखील 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आलाय. तज्ज्ञ सांगत आहे की आपली प्रतिकार क्षमता वाढवा. सर्वजण घरात असल्याने अनेकजण प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी अनेक पदार्थ तयार करुन खात असतील.

तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात गरम चहाने करतात, हाच चहा तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवू शकतो. त्यासाठी घरी मसाला चहा तयार करुन तुम्ही पिऊ शकतात.

अशी तयार करा चहा पावडर –

2 चमचे हिरवी वेलची

1 चमचा लवंग

2 चमचे काळे मिरे

4 – 5 तुकडे दालचीनी

2 चमचे सुंठ पावडर

2 चक्रफुल

असा तयार करा चहा पावडरचा मसाला –

सर्व मसाल्याची मिक्सरमध्ये बारिक पावडर तयार करुन घ्या, त्यानंतर सुंठाची पावडर तयार करा ती त्यात मिसळा. हा चहा मसाला एका बंद डब्यात ठेवा.

असा तयार करा मसाला चहा –

एका भांड्यात पाणी उकळायला ठेवा, त्या स्वादानुसार साखर किंवा मध, चहापत्ती टाका. त्यानंतर त्यात दूध टाका आणि उकळा. त्यानंतर त्यात एक चिमुट तयार केलेला मसाला टाका.

जर तुम्ही या चहातून जास्त लाभ मिळवू इच्छित असाल तर चाय तयार केल्यानंतर तो गाळून घ्या आणि चिमूटभर मसाला टाका आणि गरम गरम चहा प्या.

मसाला चहा पिण्याचे फायदे –

हा चहा रोज पिल्याने आरोग्य चांगले राहते.

रोग प्रतिकारक क्षमता मजबूत होण्याबरोबरच व्हायरस आणि बॅक्टेरिया रोखण्यास शरीर सक्षम होते.

पोटाची चर्बी कमी होण्यास मदत होते.

पोटासंबंधित समस्या जसे की कब्ज, अपचन यापासून सुटका मिळते.

खोकला, घशाच्या समस्या, डोकेदुखी, अंगदुखी दूर होते.