Coronavirus Lockdown : लासलगावला 6 दुकाने सील

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –   जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने एकीकडे कडक निर्बंध लावलेले असून जीवनावश्यक सोडून इतर सर्व आस्थापने बंद करण्याचे सूचित केले असतांना लासलगाव येथील ६ आस्थापने शासनाने ठरवून दिलेले नियम धाब्यावर बसवत उघडले असल्याचे ग्रामसेवक यांच्या तपासणीत आढळून आल्याने ६ दुकाने सील करण्यात आली असून ६२०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.यावेळी ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी गल्लोगल्ली फिरुन सुरु असलेले विनापरवानगी व्यवसायांवर धाड सत्र सुरु करत कार्यवाही केलेली आहे. यावेळी नागरीकांना त्यांनी शासनाच्या नियमांचे उल्लघन करु नये असे आवाहन केले.

येथील कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता ग्रामपालिका प्रशासनाने लासलगाव शहरात धाड टाकताच येथील ६ दुकाने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून आले. दररोज जिल्ह्यामध्ये कोरोना ग्रस्त रुग्ण संख्या मोठ्या संख्येने वाढत असताना शासनाला सहकार्य करण्याऐवजी बेकायदेशीर रित्या आपली आस्थापने सुरू ठेवून कोरोना वाढवण्याचा प्रकार या दुकानदारां मार्फत सुरू होता. दररोज प्रशासना मार्फत जण जागृती सुरू असताना या कडे दुर्लक्ष करत काही दुकाने सुरू होती

जे व्यावसायीक अत्यावश्यक सेवा आणि घर पोहोच सेवा पुरविणाऱ्या व्यावसायीकांनी कोवीड-१९ निगेटिव्ह (आरटीपीसीआर किंवा आरएटी) सर्टीफिकेट आणि ओळखपत्र जवळ बाळगणे गरजेचे आहे. सदरचे सर्टीफीकेट १५ दिवस ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानंतर पुन्हा टेस्ट करणे गरजेचे राहणार आहे. असे आवाहन ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी केलेले आहे.रुग्न पॉझिटीव्ह आल्याची माहीती मिळाल्यानंतर परिसरामध्ये सॅनिटाझर करण्यात येत असून विलगीकरण कक्ष महावीर विद्यालयामध्ये सुरु करण्यात आलेले आहे. गावठाण परिसरामध्ये ९ कंटेनमेट झोन व नवीन एनए वसाहतीमध्ये रुग्नांच्या घराला प्रतिबंधीत क्षेत्राचे फलक लावण्यात आलेली आहेत. सदरचे फलक जर परस्पर काढुन घेतले तर त्याबाबत शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल याची माहीती देण्यासाठी लेखी नोटीसही देण्याच आल्याची माहीती ग्रामविकास अधिकारी यांनी दिली.