क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्या एका संशयितानं मुलीला ‘या’ प्रकारे फोन नंबर देत केले ‘प्रपोज’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने लोकांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकले असून या लॉकडाऊनचा परिणाम लोकांच्या डेटिंगवर आणि लव्ह लाईफवरही पडत आहे. लव्ह बर्ड्स तर भेटूही शकत नाही आणि नाही एकमेकांना प्रपोज करू शकत. पण हेही खरे आहे की, प्रेम करणाऱ्यांना जास्त दिवस पिंजऱ्यात नाही ठेवू शकत. ते एकमेकांपर्यंत पोहोचायचा कोणता ना कोणता तरी रस्ता शोधूनच काढतात.

न्यूयॉर्कच्या ब्रुकलीनमध्ये राहणाऱ्या एका संशयिताने सेल्फ क्वारंटाइनमध्ये राहत असताना वेगळ्याच प्रकारे आपला फोन नंबर दिला आणि प्रपोज केले. ज्याला पाहून तुम्हाला धक्का बसेल. सोशल मीडियावर सध्या यांचा टिकटॉक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात एक मुलगा ड्रोनचा वापर करतो आणि मुलीला आपला नंबर देतो.

या व्हिडिओत जेरेमीने पूर्ण घटनेबाबत सांगितले आहे. व्हिडिओत सर्वात पहिले तो आपल्या खिडकीच्या बाहेर एका मुलीला नाचताना पाहतो आणि तिला हॅलो बोलतो तीही परत हॅलो बोलते. यानंतर जेरेमी ड्रोनवर नंबर चिटकवून ते पाठवून देतो आणि एका तासानंतर त्याला मुलीचा मेसेज येतो.

हा व्हिडिओ जेरेमी कोहेनने आपल्या ट्विटर हॅण्डलवरही शेअर केला असून तो लाखो लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओच्या टायटलमध्ये क्वारंटाइन क्युटीची प्रेमकथा लिहिले आहे. या व्हिडिओला खूप लाईक्स मिळाल्या आहेत. कोरोना व्हायरसने जगभरात दहशत पसरवली असून लोकं मृत्यूच्या छायेत राहण्यास मजबूर आहेत. पण हा व्हिडिओ लोकांना नवीन ताकद देत आहे.