‘लॉकडाऊन’मध्ये काम नसल्यानं वैतागलेला अभिनेता मनीष पॉल म्हणतो – ‘आता तर मी मुंडनही होस्ट करू शकतो’ !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोना व्हायरसमुळं गेल्या 2 महिन्यांपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे. सारं काही ठप्प झालं आहे. अनेकजण पुन्हा कामावर जाण्यासाठी आतुर झाले आहेत. या पैकीच एक आहे तो म्हणजे अ‍ॅक्टर आणि होस्ट मनीष पॉल. मनीष पॉल हा देखील त्याच्या कामावर पुन्हा जाण्यासाठी आतुर होऊन वाट पहात आहे.

मनीष पॉलनं त्याच्या इंस्टावरून एक पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यानं त्याची व्यथा मांडली आहे आणि कामही मागितलं आहे. त्यानं सांगितलं आहे की, आता तो मुंडनही होस्ट करू शकतो. आपल्या पोस्टमध्ये मनीष म्हणतो, “मी अ‍ॅक्टर आहे. मी होस्टदेखील आहे. लॉकडाऊननंतर पुन्हा कामावर जाण्यासाठी मी इच्छुक आहे. इथून पुढे मी सेटवर वेळेत येईन. पूर्ण 12 तास मी काम करेन. एखादा तास जास्तही देईन. मी आणि माझा स्टाफ हवं तर घरूनच जेवण आणू. व्हॅनिटीत फळं आणि बिस्कीटंही मागणार नाही. जर एखादा सिनेमा, रिअ‍ॅलिटी शो किंवा वेब सीरिजचं होस्टींग असेल तर मला संपर्क करा. आता तर मी मुंडनही होस्ट करू शकतो.”

View this post on Instagram

Name:Maniesh Paul Age: according to the character Height:6 feet 1 1/2 inches Complection: fair Main ek actor hoon…host bhi hoon(zoom to see pics clearly)…post lockdown looking to get back to shoots… I will be on the set on time with minimum entourage😜😜…will give 12 hours( 1 hour extra bhi chalega😜😜🤣🤣)…main khana bhi ghar se laoonga…mera staff bhi ghar se hi khana layega…vanity mein fruits bhi nahi chahiye aur na hi bicuits hahahaha…please feel to free contact for films,web films,webshows,realityshow hosting,i even host mundans😜😜🤣🤣…jai mata di …lets bounce back!! (Feel free to DM for colabs)#mp #workprofile #lifepostcorona #quarantinelife #workisworship #letsfightback #bounceback

A post shared by Maniesh Paul (@manieshpaul) on

मनीषची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा फनी अंदाज साऱ्यांनाच आवडला आहे. लॉकडाऊनमुळं त्याला कामाचं महत्त्व कळालं आहे हे त्यानं विनोदी अंदाजात सांगितलं आहे.

मनीषनं केलंय अनेक शोटं होस्टींग
मनीषच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्यानं इडियन आयडल, झलक दिखलाजा, नच बलिए, असे अनेक शो होस्ट केले आहेत. त्यानं अनेक सिनेमातही काम केलं आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like