Coronavirus : दिलासादायक ! भारताला G-20 देशांची मिळाली ‘साथ’, मिळून बनवणार ‘कोरोना’ला नष्ट करण्याचं ‘हत्यार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्णांची संख्या 17 हजाराच्या वर गेली आहे. तर 547 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार अद्याप कोरोनाच्या रोगावर कोणतीही लस नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हाच एक पर्याय आहे. सोशल डिस्टन्सिंग हेच कोरोनाला रोखण्याचे सध्यातरी औषध आहे. जगभरातील अनेक देश कोरोनावर लस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता भारत देखील जी-20 देशांच्या सोबत कोरोनावर लस शोधण्याचे काम करणार आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, कोरोनाशी सामना करण्यासाठी सर्व बाबतीत जागरुक राहण्याची गरज आहे. त्यांनी सांगितले की, लोकांच्या पुढाकारामुळे इतर देशांच्या तुलनेत भारताची परिस्थिती चांगली आहे. सुरुवातीला 3.4 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत होती. आता 7.5 दिवसांत रुग्णांची सख्या दुप्पट होत आहे.

लव अग्रवाल यांनी पुढे सांगितले की, गेल्या 14 दिवसात 23 राज्यातील 59 जिल्ह्यात एकही कोरोनाच्या प्रकरणाची नोंद झालेली नाही. गोव्यात देखील एकही रुग्ण नाही. 19 एप्रिल पर्यंत 18 राज्यातील रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा दर कमी झाला आहे. देशातील जयपूर, इंदूर, पुणे, कोलकता आणि इतर काही शहरांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. केंद्राची तीन पथके महाराष्ट्रात राज्य सरकारबरोबर काम करत आहेत. इतर ठिकाणांवरही नजर ठेवली जात आहे.

लॉकडाऊनच्या परिस्थितीचे निरीक्षण
आयसीएमआरच्या मते, एखाद्या प्रकरणासाठी रॅपिड टेस्ट घेतली जाऊ शकत नाही. रॅपिड टेस्ट ही कोरोनाची लक्षण शोधण्यासाठी आहे. 100 पैकी 80 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षण दिसत नाहीत. दुसरीकडे गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, हॉटस्पॉट असलेल्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी राज्य सरकारने पथकाची मदत घ्यावी.

काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे उल्लंघन केल्याच्या घटना उघडकीस आली आहेत. अशा ठिकाणी राज्यांच्या मदतीने कारवाई करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेतली जात आहे. तसेच पीएम सफल योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे.

देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17656 झाली आहे. आतापर्य़ंत 559 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2842 रुग्ण बरे झाले आहेत. देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक संक्रमण झाले असून पुणे आणि मुंबईची परिस्थिती गंभीर आहे.