राज ठाकरेंनी सांगितले मास्क न बांधण्याचे ‘कारण’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मास्क घातला नव्हता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांना वारंवार काळजी घेण्याचे आवाहन केले जात असताना राज यांनी मास्क न घातल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. यासंदर्भात पत्राकारांनी त्यांना विचारले असता, सगळ्यांनी मास्क लावला आहे, त्यामुळे मी लावला नाही असे उत्तर दिले.

राज ठाकरे यांनी लॉकडाउन संपेल तेव्हा एक्झिट प्लॅन काय असेल अशी विचारणा केली. तसेच लॉकडाउनमुळे राज्य सोडून गेलेल्या परप्रांतीयांना तपासणी केल्याशिवाय महाराष्ट्रात घेतले जाऊ नये असा सल्ला राज्य सरकारला दिला. संबंधित राज्यात काय परिस्थिती आहे याची आपल्याला कल्पना नाही. कामगारांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती वेळ आहे, नंतर ते करता येणार आहे.

कारण आतापर्यंत जो गुंता झाला तो सोडवता येऊ शकतो, असेही राज ठाकरेंनी सांगितले आहे. गेले दीड महिना पोलीस थकले असून प्रचंड तणावाखाली आहेत. काही ठिकाणी पोलिसांना गृहीत धरले जात आहे. अशा ठिकाणी एसआरपीएफ तैनात करावे. त्यामुळे दरारा निर्माण होईल. जेणेकरुन लोक बाहेर येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.