Coronavirus Lockdown : ‘कोरोना’चे सावट असूनही वीजवितरण विभाग ‘तत्पर’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या ससंर्गामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत पडद्यामागे राहून चोवीस तास कार्यरत असणारा महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी प्रसिद्धीपासून कोसो दूर आहेत. उन, वारा, पाऊस असला तरी, विद्युत पुरवठा खंडित झाला तरी तातडीने दुरुस्ती करण्यासाठी धावत असतो. कोरोना व्हायरसच्या संसर्ग होऊ नये म्हणून कार्यत असलेल्या रुग्णालय आणि नागरिकांना अखंडित वीज पुरविण्याचे काम केले जात आहे, त्यांच्याकडे मार्ग सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे, अशी भावना सूज्ञ नागरिकांनी व्यक्त केली.

हडपसर पोलीस स्टेशन ते शेवाळेवाडी टोल नाका, महादेवनगर, शेवाळेवाडी, मोरेवस्ती, मांजरी, झेड कॉर्नर, मांजरी-मुंढवा रस्ता, गोपाळपट्टी आदी भागामध्ये रास्ता पेठ येथील मुख्य अभियंता सचिन तालेवार, अधीक्षक प्रकाश राऊत, बंडगार्डन विभागाचे कार्यकारी अधिकारी सतीश राजदीप यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसरचे अतिरिक्त कार्यकारी अधिकारी पंडित दांडगे, मांजरीचे सहायक अभियंता विकास तायडे, तांत्रिक कर्मचारी किरण कुंभार, पोपट सातपुते, सचिन पवार, अंकुश वाघ, पांडुरंग मोरे, श्रीनिवास दुधभाते, सुयोग कामठे, प्रीतम कारंजवणे, रामदास अदारे, अजिज तांबोळी, आशिष काळे, हर्षद लोखंडे, जयेश विभुते, राहुल व्हावले, स्वप्नील धर्माधिकारी यांचे पथक वीज वितरण व्यवस्था सुरळीत करण्याचे काम करीत आहे.

पावसामुळे झाडांच्या फांद्या विद्युत वाहकतारांवर पडल्याने वीद्युतपुरवठा खंडित होण्याचे प्रकार होतात. अनेक ठिकाणी फ्यूज जाण्याचे प्रकार होतात, अशावेळी नागरिक वीजवितरणला भ्रमणध्वनीवरून माहिती देतात, त्यानंतर विद्युत विभागातील अधिकारी आणि कर्मचारी तातडीने दखल घेऊन दुरुस्ती करण्याचे काम करीत आहे, असे येथील नागरिकांनी सांगितले.