ट्विटरवर शेअर होतायेत ‘पॉर्न’ व्हिडीओ, राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली गंभीर दखल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरात पसरलेल्या कोरोना विषाणूने भारतासह संपूर्ण जगात दहशत पसरली आहे. या जीवघेण्या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मोदी सरकारने देशव्यापी लॉकडाऊन लागू केले असून लोक घरात कैद झाले आहेत. दरम्यान, ट्विटरवर बलात्काराचे व्हिडिओ आणि अश्लील सामग्री शेअर केली जात असून राष्ट्रीय महिला आयोगाने (एनसीडब्ल्यू) दखल घेतली आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाने सांगितले की आम्हाला त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एक मेसेज मिळाला आहे, ज्यात म्हटले गेले आहे कि बलात्काराचे व्हिडिओ आणि अश्लील सामग्री मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून कोरोना विषाणूमुळे एक सामाजिक कुप्रथा होईल अशी चिंता व्यक्त केली आहे.

कोरोना विषाणूचा प्रसार भारतासह संपूर्ण जगात झाला असून या जीवघेण्या व्हायरसमुळे भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, मॉल्स, क्लब, बाजारपेठा, थिएटरसह सर्व सार्वजनिक ठिकाणे शांत झाली आहेत. हे सर्व असतानाही कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाहीये.

आतापर्यंत भारतात कोरोना विषाणूच्या ११,९३३ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ३९२ लोकांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त अमेरिकेत कोरोनाची प्रकरणे असून ६ लाख १४ हजारांहून अधिक लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यातील २७ हजार ७६० लोकांनी आपला जीव गमावला आहे.