Coronavirus Lockdown : ‘बोरगाव’च्या ‘नवाज चाचा’साठी ‘करजगी’चा महेश ठरला ‘देवदूत’ !

सोलापूर/महेश गायकवाड : पोलीसनामा ऑनलाइन –  कर्नाटकात अडकलेल्या मुल्ला कुटूंबाला बोरगाव पर्यंत पोहोचवनारा पडद्यामागील खरा हिरो म्हणजे जलसंघर्ष समिती चे संस्थापक महेश कटारे होय. कर्ता धरता पोटचा मुलगा अचानक मनोरुग्ण होणं, त्याच्या उपचारासाठी कर्नाटक राज्यातील दर्गाह मध्ये जावं लागणं, महिन्याभरात मुलावर झालेल्या उपचारानंतर मुलाला किंचित बरं वाटणं आणि भरीस भर म्हणून कोरोना सारखं महाभयंकर संकट जगासमोर उभं राहिल्यानं दर्गाह मधून बाहेर पडावं लागणं आणि कर्नाटक च्या शेत शिवारात वणवण भटकत राहणं या सर्व यातना भोगणाऱ्या बोरगाव च्या नवाज मुल्ला यांनी बोरगाव ला पोहोचेपर्यंत अनुभवास आलेल्या माणुसकीचा व माणुसकीच्या वेषात आलेल्या ढोंगी प्रवृत्ती चा आँखों देखा हाल मांडताना डोळ्यात अश्रू आणले.

घडलं असं की अक्कलकोट तालुक्यातील बोरगाव दे. येथील शेतकरी नवाज बाशा मुल्ला यांच्या मुलाला उपचार करण्यासाठी कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यातील करोशी या गावी हजरत पीर बाबा नुरशा दर्गाह येथे फेब्रुवारी महिन्यात उपचारासाठी नेले. अचानक उद्भवलेल्या कोरोना व्हायरस च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीत नवाज यांना मुलगा व पत्नी यांना घेऊन दर्गाह मधून बाहेर पडावे लागले. तोपर्यंत संचारबंदी लागू झालेली असल्याने या कुटूंबाला रानोमाळ भटकण्याची वेळ आली. सोशियल मेडिया वरील यासंदर्भातील पोस्ट पाहून तालुक्यात पाण्यासाठी संघर्ष करणारे करजगी चे उमदे नेतृत्व महेश कटारे यांनी माझ्या तालुक्यातील व्यक्ती अडचणीत आहे तेंव्हा आपण कर्नाटकातील मित्रपरिवार व राजकीय नेत्यांची मदत घेऊन या वृध्द व्यक्तीला व त्याच्या कुटुंबाला बोरगाव पर्यंत सुखरूप पौहचवायचे या हेतूने नवाज मुल्ला यांच्याशी संपर्कात राहून बेळगाव चे खासदार प्रकाश हुक्केरी, विजापूर चे काँग्रेस चे खासदार ऍड रमेश जिगजनगी, विजापूर चे एस. पी.राम सिंग. इर्शाद मुल्ला, चिकोडी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक या सर्वांशी संपर्क साधून नवाज मुल्ला यांना मुळगावी आणण्याची योजना आखली. एवढेच नव्हे तर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या चिरंजीवांशी संपर्क साधून दर्गाह ट्रस्ट च्या विश्वस्त मंडळाची दोन वेळा बैठक लाऊन नवाज मुल्ला यांना सुखरूप बोरगाव ला पोहोचवण्यासाठी प्रवास भाडे व इतर खर्च म्हणून 14000 रुपये ट्रस्ट च्या वतीने मुल्ला यांना देण्याविषयी बैठकीत निर्णय घ्यायला भाग पाडले.

त्यानंतर महेश कटारे यांनी बोरगाव येथून चारचाकी वाहनाची व्यवस्था करून संचारबंदी च्या सर्व नियमांचे पालन करीत आर. टी. ओ. पास काढण्यापासून ते परत येताना संबधित व्यक्तींच्या भोजन व्यवस्थेपर्यंत चे चोख नियोजन केले. व ठरल्याप्रमाणे महेश यांच्या मार्गदर्शनानुसार प्रवास करत नवाज मुल्ला बोरगाव ला पोहोचले.

हा सर्व घटनाक्रम नवाज मुल्ला यांनी सांगितला तेंव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.

माझी ओळख ही नाही कधी पाहिलं देखील नाही असा एक अनोळखी व्यक्ती महेश कटारे ने या संपूर्ण कालावधीत मला जवळपास शंभर वेळा फोन वर संपर्क साधला. महेश कटारे सोबत फोन वर बोलताना चौदा हजार प्रवास भाडे देण्यापेक्षा मी इथंच फाशी घेऊन मरेन कारण माझी परिस्थिती खुपच हालाखीची आहे. हे माझे शब्द ऐकताच महेश ने मला कन्नड भाषेत समजावले….’ ए मुत्त्या रोक्कीन काळजी माडभ्याडा, नी वंदु रूपया कुडादु इल्ला निन्दु यल्ला व्यवस्था ना माडत. ना निंनग चौदा हजार दर्गाह कडदु इसकुडत.’ या वाक्याने मी सावरलो व गाडीत बसून यायला तयार झालो. असा दुसऱ्यांचे दुखः जाणणारा व शेवटपर्यंत अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत करणारा व्यक्ती भेटणं दुर्मिळच आहे. महेश माझ्यासाठी संकटमौचक देवदूत ठरला. – नवाज मुल्ला , देशमुख बोरगाव.

अक्कलकोट तालुक्याचा माणूस अडचणीत आहे हे पाहून मी लगेचच कामाला लागलो. कर्नाटक मधील माझे सर्व मित्र, राजकीय पुढारी, पोलीस अधिकारी एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांचे सुपुत्र यदीयुर यांच्याशी व शिवमोग जिल्हा खासदार राघवेंद्र यांचे स्वीय सहायक अजित यांच्याशी संपर्क करून नवाज चाचाना बोरगाव पर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली. एका गरजवन्ताला मदत केली यातच मोठे समाधान आहे. कधीच न पाहिलेल्या अनोळखी नवाज चाचाना काल भेटल्यानंतर ओळख सांगितली तेंव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. माझ्या आजपर्यंतच्या सामाजिक कार्यातील हे कार्य अविस्मरणीय राहील. दोनच दिवसात ट्रस्ट कडून नवाज चाचा यांच्या बँक खात्यात प्रवास खर्चाची रक्कम जमा होईल. –
महेश कटारे, संस्थापक/अध्यक्ष जलसंघर्ष समिती अक्कलकोट

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like