कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीने केली ‘कोरोना’शी लढण्याची पूर्ण तयारी, घरोघरी तपासणी

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – (शरद पुजारी) कोरोना महामारीला हद्दपार करण्यासाठी अनेकविध उपाययोजना आखल्या जात आहेत यामध्ये हवेली तालुक्यातील कदमवाकस्ती ग्रामपंचायतीने आपल्या नागरिकांची मोफत आरोग्य चाचणी घेण्याचा उपक्रम हाती घेतला यासाठी या गावातील प्रसिद्ध डाॅ. रतन काळभोर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी व सरपंच गौरी गायकवाड व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या माध्यमातून याची तपासणी करण्यात आली.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकवीस दिवसाचा संपूर्ण लाॅकडाऊन केल्यावर कदमवाकस्ती ग्रामपंचायतीने कोरोना प्रतिबंध समितीचे गठण केले यामध्ये प्रत्येक वार्डातील सदस्यांचा सहभाग करुन घेतला.प्रत्येक वार्डात दोन मशिनच्या माध्यमातून निर्जंतुकीकरण फवारणी केली तर प्रत्येक कुटूंबाला घरपोच सेवा देत आहेत.केवळ नागरिकांनी घराबाहेर आजिबात पडू नये असे आवाहन चित्तरंजन गायकवाड यांनी केले.ग्रामपंचायत नागरिकांना प्रत्येक सेवा घरपोच देणार असल्याचे सांगितले.
या महामारीची भिती सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे त्यामुळे प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करण्याचे ठरविले त्यासाठी त्यांना डाॅ रतन काळभोर यांचे मोठे सहकार्य लाभले आहे.कार्यक्षेत्रातील घरोघरी जाऊन सर्वांची तपासणी करण्यात आली.