Lockdown : मानवाधिकार आयोगाच्या रिपोर्टनं खळबळ ! नायजेरियामध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणार्‍या 18 जणांचा पोलिसांकडून ‘एन्काऊंटर’

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनामुळे जगभरात हाहाकार उडाला असून बहुतांश देशात व्हायरसची बाधा थोपविण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउनची काटेकोरपणे अमलबजावणी केली जावी यासाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. नायजेरियात लॉकडाउनचे उल्लंघन करणार्‍या 18 जणांचे एन्काउंटर करण्यात आल्याचे मानवाधिकार आयोगाने सांगितले आहे.

नायजेरियात कोरोनाचे एकूण 407 रुग्ण आढळले असून व्हायरस अजून वेगाने पसरण्याची भीती आहे. नायजेरियन पोलिसांची प्रतिमा क्रूर अशीच मलिन आहे. काऊन्सिल ऑफ फॉरेन रिलेशन्सने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एक वर्षात संपूर्ण देशभरात 1 हजार 476 जणांची हत्या करण्यात आली आहे. मानवाधिकार आयोगाने अहवालात दिलेल्या माहितीनुसार, आठ वेगवेगळ्या घटनांमध्ये 18 जणांची हत्या करण्यात आली आहे. आयोगाने 36 पैकी 42 राज्यांमधून जवळपास 100 तक्रारी आल्या असल्याचे सांगितले आहे. मानवाधिकार आयोगाच्या अहवालावर अद्याप सुरक्षा दलाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.