Lockdown : ‘लॉकडाऊन’नंतर बदलणार शॉपिंगची पध्दत ! ‘या’ प्रकारच्या व्यवसायात होणार ‘वृध्दी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरना विषाणूचा सामना करण्याचे मोठे आव्हान जगासमोर आहे. या विषाणूमुळे भारतामध्ये सलग 40 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनचा कालावधी 3 मे रोजी संपत आहे. यानंतर जनजीवन पुन्हा पुर्ववत होईल अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. परतु 3 मे नंतरही गर्दीसंदर्भात कठोर नियम लागू शकतात, कारण कोरोनामुळे झालेली परिस्थिती पुन्हा पुर्ववत होण्याची शक्यता कमी आहे. तज्ज्ञांच्यामते लॉकडाऊन संपल्यानंतर जागरुक नागरिकांना गर्दीत जाणे आवडणारे नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत खरेदीचा मार्ग देखील बदलू शकतो.

इन्व्हेस्ट ऑनलाइन डॉट कॉमचे संस्थापक अभिनव अँगिरीश यांनी सांगितले की, ज्या लोकांमध्ये कोरोना विषाणूच्या धोक्याची जाणीव आहे असे लोक पुढील काही महिने तरी गर्दीत जाण्याचे टाळतील. लोक रेस्टॉरंटऐवजी ऑनलाइन फूड डिलिव्हरीमधून ऑर्डर करणे पसंत करतील. लोकं खरेदीसाठी मॉल किंवा दुकानात खरेदीसाठी जाण्याऐवजी ऑनलाइन खरेदी करु शकतात. तसेच किराणा दुकानात जाण्याऐवजी ऑनलाइन सामानाची खरेदी करणे पसंत करतील असे अँगरिरीश यांनी सांगितले.

अशा परिस्थितीमध्ये ई-कॉमर्स/ऑनलाइन कंपन्यांची चांदी होईल. या परिस्थितीत ई-कॉमर्स कंपन्यांकडे मागणी वाढेल परंतु वस्तूंची होम डिलिव्हरी करण्यासाठी कंपन्यांना मनुष्यबळ कमी पडू शकते. हे संकट लक्षात घेऊन बहुतेक ई-कॉमर्स कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची भरती करण्यास सुरुवात केली आहे. अलिकडेच ऑनलाइन किराणा सामानाची डिलिव्हरी करणारी कंपनी बिगबास्केट आणि ग्रॉफर्स या कंपन्यांनी 12 हजार कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

कंपन्यांवरील जबाबदारी वाढली
सद्य परिस्थितीत असे दिसून येत आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव एवढ्या लवकर संपणार नाही. अशा परिस्थिती ई-कॉमर्स कंपन्यांची जबाबदारी वाढली आहे. या कंपन्यांना होम डिलिव्हरी करणाऱ्या मुलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये एका पिझ्झा डिलिव्हीर करणाऱ्या मुलाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या मुलाने 72 घरांमध्ये पिझ्झाची डिलिव्हरी केली आहे. त्यामुळे प्रशासनाने मुलाच्या संपर्कात आलेल्या 17 मुलांना आणि 72 कुटुंबातील व्यक्तींना क्वारंटाइन केले आहे. जर कंपन्यांनी त्यांच्या कडे काम करणाऱ्या मुलांची किंवा कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर कोरोनाचा फैलाव होऊ शकतो.