Corona Lockdown 2.0 : बँक आणि ATM साठी जारी करण्यात आले नवीन नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोनाव्हायरस (कोविड १९) चा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन पार्ट २ ची मुदत ३ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. परंतु या सर्वांच्या दरम्यान सरकारने अनेक सेवांवर दिलासा देण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात शासनाची नवीन मार्गदर्शक सूचनाही जाहीर करण्यात आली आहेत. जेणेकरून लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. आपण बँक आणि एटीएम सेवांबद्दल बोलायचे झाल्यास ‘या’ सुविधा उपलब्ध राहतील. चला वित्तीय सेवांबाबत सरकारने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांविषयी जाणून घेऊया …

(1) बँकांच्या सर्व शाखा व एटीएम खुल्या राहतील. सर्व प्रकारच्या बँकिंग सेवा सुरू राहतील. बँकिंग प्रतिनिधी आणि एटीएममध्ये रोख ठेवणारी व्यवस्थापन संस्था देखील पूर्वीप्रमाणेच काम करत राहील.

(I) बँकेच्या शाखेला डीबीटी (Direct Benefit Transfer) रोख हस्तांतरण पूर्ण होईपर्यंत सामान्य कामकाजाच्या वेळेनुसार ऑपरेट करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

(II) स्थानिक प्रशासनाला बँकेच्या शाखांमध्ये पुरेसे सुरक्षा कर्मचारी तैनात करावे लागतील. जेणेकरून सोशल डिस्टंसिंग आणि कायदा व सुव्यवस्था कायम राहील.

(2) NPCI, CCIL, पेमेंट सिस्टम आणि स्टँडअलोन प्राइमरी डीलर सर्व्हिसेस यासारख्या सर्व वित्तीय बाजाराचे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँकेद्वारे नियमित नियमन केले जाईल. जर सोप्या शब्दात सांगायचे झाले तर सर्व ऑनलाइन बँकिंग सेवा आणि गूगल पे सर्व्हिस काम करीत राहील.

(3) शेअर बाजार आणि बाँड मार्केटमध्येही व्यापार सुरू राहील. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण(IRDAI) आणि विमा कंपन्याही आपले काम सुरू ठेवतील.

महत्वाचे म्हणजे , नव्या नियमांनुसार राज्य सरकारने ज्या भागाला रेड झोन घोषित केले तिथे हे नियम तिथे लागू होणार नाहीत. आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच याची अंमलबजावणी केली जाईल.