Coronavirus Lockdown : बेळगाव जिल्ह्यात अडकलेले कुटुंब 8 दिवसानंतर जन्मभूमीत दाखल

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – संचारबंदी मुळे बेळगाव जिल्ह्यातील कोरोसी येथे अडकलेल्या कुटुंबाची सहीसलामत घरवापसी झाली असून हे कुटुंब अक्कलकोट तालुक्यातील आपल्या मूळ गावी बोरगाव देशमुख येथे आज सोमवारी पहाटे 5 वाजता पोहचले. सलग अठरा तास प्रवास करून व तब्बल९०० किलोमीटरचे अंतर कापून बेळगांव जिल्ह्यातुन वृद्ध आई -वडील आणि मुलाला सुखरूप बोरगांव येथे आणण्यात आले आहे.

बोरगाव दे ता अक्कलकोट येथील नवाज गौडगाव त्यांच्या पत्नी साहेबी व मुलगा हैदर हे गेल्या अनेक दिवसांपासून कोरोसी ता चिकोडी जि बेळगांव ह्या गावात संचारबंदीमुळे अडकले होते. संचारबंदीच्या काळात त्यांना अन्न व निवाऱ्या पासून मुकावे लागले होते. गेल्या नऊ दिवसापासून अंघोळ नाही, जवळ पैसे नाहीत, रानोमाळ भटकंती करीत एका झाडाचा विसावा घेत हे सर्वजण जीवन जगत होते. काल यांची कैफियत व माहिती चिकोडी येथील एका दर्गा चे मुतवल्ली यांनी अक्कलकोट मधील काही लोकांच्या कानावर घातली, यानंतर जलसंरक्षण समितीचे अध्यक्ष महेश कटारे यांनी व त्यांच्या टीमने या बाबतीत लक्ष घालून या कुटुंबाला अक्कलकोट ला आणण्याचा निर्धार केला.

आणि आपली यंत्रणा राबवून गेल्या चार दिवसांपासून त्यांनी आपली माणस आपली गावी सुखरूप यावेत यासाठी अनेक शक्कल लढवली. काल सकाळी रविवार दि २९ अधिकृत चारचाकी वाहन व वाहनाचा परवाना घेऊन त्यांना कोरोसी जि बेळगाव ९०० किमी इतके लांब असलेले गाव चार जिल्हे व दोन राज्य ओलांडून आणि १८ तास प्रवास करून त्यांना त्यांच्या मूळगावी सोमवार दि ३० रोजी सकाळी ५ वाजता बोरगावला आणले.

हे करत असताना कटारे यांना
अनेक अडचणी व संकटे आली, पण संकटे आली म्हणून हारायचे नाही, आपण इतक्या लांब आलो आहे. रिकाम्या हाताने परतायचे जायचे नाही. या वृद्ध आणि गरीब कुटुंबाला सुखरूप त्यांच्या गावी पोहचवावे इतकेच त्यांनी ध्येय ठेवले होते. ययाकामी त्यांना अनेक मित्रांनी साथ दिली. यात विशेष म्हणजे गाडी चालक मल्लिकार्जुन फुलारी यांनी सलग न थांबता अठरा तास गाडी चालवूनया चार जणांना आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी मध्ये घेऊन आले.