Coronavirus Impact : मोफत मिळणार्‍या रेशनसाठी लोकांनी केली गर्दी, ‘कंट्रोल’ न झाल्यानं जमावानं SDM चे कपडेच फाडले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे कोरोना विषाणूची भीती आणि दुसरीकडे लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. पंजाबमधील फरीदकोट येथेही असेच काहीसे समोर आले आहे. जेव्हा गोरगरीब व मजुरांना खाण्यासाठी रेशन मिळाली नाही तेव्हा गर्दी फरीदकोटच्या कोटकपूर भागातील एसडीएम कार्यालयात पोहोचली. तेथे पोहोचल्यावर गर्दी इतकी अनियंत्रित झाली की लोकांनी रेशनसाठी एकमेकांचे कपडे फाडण्यास सुरवात केली. मोठ्या अडचणीत या परिस्थितीला नियंत्रित करण्यात आले.

लॉकडाऊनमुळे लोकांची कामे बंद असून गरीब मजुरांसमोर अन्नाचे मोठे संकट उभे राहिले आहे. कोणालाही खाण्यापिण्याची अडचण उद्भवू नये यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. असे असूनही लोक खूप घाबरले आहेत.

फरीदकोटमध्ये जेव्हा एसडीएम त्यांच्या कार्यालयाबाहेर लोकांना रेशन वितरण करीत होते. तेव्हा तेथे धान्य घेण्यासाठी गर्दी उसळली आणि चेंगराचेंगरी झाली. लोक इतके अनियंत्रित झाले की त्यांनी एकमेकांचे सामान हिसकावण्यास सुरवात केली. एवढेच नाही तर लोक एसडीएम चे कपडे देखील ओढू लागले. परिस्थिती इतकी वाढली की एसडीएम ने मोठ्या अडचणींचा सामना करत आपले प्राण वाचवले.

लोकांना वारंवार आवाहन केले जात आहे की सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांचे पालन करावे. जेणेकरून विषाणूचा धोका कमी होऊ शकेल. परंतु लोक याकडे योग्य लक्ष देत नाहीत. येथे तर लोक आपापसात भिडलेले होते. या भागाची लोकसंख्या दीड लाख असून त्यापैकी पन्नास हजार लोक असे आहेत जे गरीब वर्गात मोडतात आणि ज्यांना मोफत रेशनची गरज आहे.

जिल्हा प्रशासन वारंवार फोन करून लोकांना त्यांच्या समस्येबद्दल माहिती देण्याचे आवाहन करीत आहे. रेशन किंवा खाण्यापिण्याशी संबंधित सर्व काही गोष्टी घरपोच पुरवल्या जातील. परंतु लोक भीतीत जगत आहेत, ज्यामुळे परिस्थिती नियंत्रणात येत नाही. देशात 21 दिवसांचे लॉकडाउन सुरू आहे, जे 14 एप्रिल रोजी संपणार आहे.

You might also like