धक्कादायक ! ‘लॉकडाउन’मध्ये देशात सर्वाधिक पाहिले जातात ‘पॉर्न’ व्हिडिओ

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनामुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे घरात असलेल्यांकडून इंटरनेट वापराबाबत धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. पॉर्नहबने दिलेल्या आकडेवारीत भारतात सर्वाधिक अडल्ट कंटेंट पाहण्याचे प्रमाण वाढले होते. आता त्यानंतर चाइल्ड पॉर्नोग्राफीची मागणी वाढल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. इंडिया चाइल्ड प्रोटेक्शन फंड (आयसपीएफ) ने हे सांगितले आहे.

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन झाल्यानंतर चाइल्ड पॉर्नोग्राफी कंटेंटच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सोशल इम्पॅक्ट फंडाच्या अहवालात लॉकडाऊननंतर ऑनलाइन डेटा मॉनिटरिंग वेबसाइटची आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये चाइल्ड पॉर्न, सेक्सी चाइल्ड आणि टीन सेक्स व्हिडिओ हे सर्वाधिक शोधण्यात आले आहे. जगातील सर्वात मोठी पॉर्न साइट असलेल्या पॉर्नहबच्या डेटामध्येही याच गोष्टी पुढे आल्या होत्या. आधीपेक्षा 24 ते 26 मार्च दरम्यान अड़ल्ट कंटेंट पाहण्याचे प्रमाण जवळपास 95 टक्के वाढले आहे.

देशभरातील शंभर शहरांच्या रिसर्चमधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये देशात चाइल्ड पॉर्नोग्राफीची मागणी सर्वाधिक चेन्नई आणि भुवनेश्वर या दोन शहरांमधून होत आहे. तर यासंबंधीत कंटेंट शोधण्यामध्ये कोलकाता, सिलीगुडी, हावडा, चंदीगढ, गुवाहाटी, इंदौर, भुवनेश्वर आणि चेन्नई आघाडीवर आहे. उत्तर भारतात नवी दिल्ली, लुधियाना, रायपुरा, लखनऊ, चंदीगढ, आगरा, शिमला इथं चाइल्ड पॉर्नोग्राफीच्या शोधात वाढ झाली आहे.