Coronavirus Lockdown : ‘लॉकडाऊन’ पोलिसांनीच तोडलं, पोलिस अधीक्षकांकडून 4 कर्मचार्‍यांच्या तडकाफडकी ‘बदल्या’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिल्हाबंदी असताना एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहने सोडणे पोलिसांना चांगलेच महागात पडले असून, त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी या 4 कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले आहेत.

युसुफ वडगाव पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक कोरडे, पोलीस हवालदार कांबळे व कांदे आणि पोलीस कर्मचारी सय्यद अशी बदली करण्यात आलेल्याची नवे आहेत.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. कोणालाही घरा बाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे. बाहेर पडणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. तर नागरिक आपापल्या गावी निघून जात आहेत. आणि त्यामुळे गर्दी होत आहे. गर्दी टाळण्यासाठी आणि जिल्हाबंदी करण्यात आली आहे. मात्र नागरिक खासगी वाहने किंवा चालत गावी जात आहेत.
दरम्यान

बीड आणि लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत. बीड जिल्ह्यातून कळंब शहरातून उस्मानाबादमध्ये येता येते आणि युसूफ वडगाव येथून उस्मानाबाद जिल्ह्यात जात येते. जिल्हा बंदी असल्याने या सीमांवर पोलिसांची गस्त ठेवण्यात आली आहे.

केज तालुक्यातील युसूफ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आणि 3 कर्मचारी गस्तीवर होते.
यावेळी मात्र युसुफवडगाव हद्दीतून दोन दिवसांपूर्वी काही वाहने बीड जिल्ह्याच्या हद्दीत घुसली. परंतु या वाहनांना माजलगाव चेकपोस्ट वर पकडण्यात आले. त्यांनी युसुफ वडगाव हद्दीतून आल्याचे सांगितले.त्यानंतर याची चौकशी करण्यात आली. त्यात गस्तीवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे निदर्शनास आले. यानंतर पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी तडकाफडकी त्यांची गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाण्यात बदली केली आहे.

दरम्यान बाहेर जिल्ह्यात असणारे शेकडो लोक चोरट्या मार्गाने जिल्ह्यात प्रवेश करत आहेत.त्यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला असून चोरट्या मार्गाने प्रवेश करणाऱ्याना रोखण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू झाली आहे.