Coronavirus Lockdown : पुण्यातून ट्रकभरून निघालेल्यांना उस्मानाबाद जिल्हयात पकडलं, प्रचंड खळबळ

कळंब : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे आणि सातारा जिल्ह्यातून गावी निघालेले दोन ट्रक पोलिसांनी पकडल्यानंतर त्यात जवळपास 200 नागरिक मिळल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. कळंब शहरात पोलिसांनी हे ट्रक पकडले असून, त्यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व कामगार असल्याचे समोर आले आहे.

कोरोना आजाराने जगभरात थैमान घातले आहे. सर्व सामान्य नागरिक तर या रोगाने पूर्ण भयभीत झोले आहेत. पुणे, मुंबई आणि मोठ्या शहरातून गावी येणाऱ्या नागरिकांना त्यांच्याच गावात येऊ दिले जात नसल्याचे घटना घडल्या आहेत. शासनाने जिल्हा बंदी केली आहे. तर वाहने देखील बंद करण्यात आली आहेत. रस्त्यावर नागरिक दिसू नये, यासाठी सर्वोप्तरी प्रयत्न केले जात आहेत.

मात्र, नागरिक भीतीपोटी शहरातून गावी जात आहेत. पायी, सायकल आणि मिळेल त्या वाहनाने गाव गाठत आहेत.दरम्यान पुणे आणि सातारा जिल्ह्यात काम करणारे कामगार काल रात्री ट्रक मध्ये गावी जाण्यास निघाले होते. दोन ट्रक होते. त्यात जवळपास 200 हुन अधिक नागरिक होते. हे नागरिक गंगाखेड तालुक्यातील असल्याची माहिती देण्यात येत आहे.

मात्र, शहरामध्ये पोलीस गस्त घालत बाहेर फिरणाऱ्यांना अडवत आहेत. त्यांची चौकशी करून सोडण्यात येत आहे. तर ट्रक, खासगी बसेस देखील चेकिंग केली जात आहे.कळंब शहर पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांना दोन ट्रक दिसून आले. त्यांनी या ट्रकची पाहणी केली. त्यावेळी त्यात हे नागरिक गावी निघाले असल्याचे दिसून आले. त्या सर्वांना आता येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याठिकाणी त्यांची तपासणी करण्यात येत आहे.

कामे बंद झाली आणि अन्नही मिळेना

ट्रकमधील सर्व नागरिक पुण्यात मिळेल ते काम करत होते. मात्र, कोरोनामुळे सर्वच कंपन्या आणि उद्योग बंद आहेत. त्यामुळे त्यांचे कामे बंद झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या खाण्याची अडचण झाली आहे. त्यामुळे ते गावी निघाले असल्याचे नागरिक सांगत आहेत.

कुठंच त्यांची चेकिंग झाली नाही

पुण्यातून हे दोन ट्रक मानस घेऊन निघाल्यानंतर त्यांना कळंबपर्यत कुठे अडविले नाही. किंवा त्यांची तपासणी केली नाही, असे ट्रक चालक माहिती देत आहेत. त्यामुळे पोलिसांच्या तपासणीवर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित झोले आहेत. ट्रक मध्यरात्री पुण्यातून निघाले होते.