Lockdown : सोलापूरमध्ये लॉकडाऊनचं उल्लंघन करणार्‍या 84 जणांना अटक, 1000 वाहने जप्त

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर शहरातील अनेक भागात लॉक डाऊन पाळले जात नसल्याचे आढळून येत आहे. लॉक डाऊन न पाळणे, हे त्यांच्यासाठी घातक च आहे, तरीही याची तमा न बाळगता अनेक तरुण मुले घराबाहेर पडत असून विनाकारण बाहेर ईकडून- तिकडे, फिरत आहेत. दरम्यान आज सोलापूर पोलिसांनी जवळपास 1000 हुन अधिक दुचाकी आणि 500 पेक्षा अधिक चार चाकी वाहन चालकांवर मोकाट फिरण्याबद्धल कारवाई केली असून जवळपास 1000 वाहने आज दिवसभरात जप्त करण्यात आली आहेत तर सकाळी 84 नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

लॉक डाऊन चे उल्लंघन करत सम्राट चौक, बाळीवेस, श्राविक हायस्कुलचा भाग, तसेच बुधवार पेठचा भाग आणि कस्तुरबा मार्केट, व मार्केट चा परिसर, तसेच न्यु बुधवार पेठ,शाहीर वस्ती, रुपभवानी रोड परिसर, डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसर, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर झोपडपट्टी, तसेच हनुमान नगर आदि परिसरातील व त्यांच्या गल्यामधील तरुण मुले व नागरिक मोठ्या संख्येने वारंवार घराबाहेर पडत असून लॉक डाऊन चे उल्लंघन करत आहेत. त्यामुळे या भागातील घरात बसणाऱ्या नागरिकांना मात्र यांच्या बाहेर फिरण्याचा नाहक त्रास होत आहे. लॉक डाऊन पाळत नसल्यामुळे या भागात लॉक डाऊन ची ऐशी की तैशी झाली आहे.

वास्तविक लॉक डाऊन मध्ये घराबाहेर पडण्यास कायद्याने मनाई करण्यात आली आहे, परंतु लॉक डाऊन चे वारंवार उल्लंघन करणे या भागात सुरू आहे.

पोलिस किंवा पोलिस गाड्या आल्या की आपल्या घराकडील बोळात पळून जायचे, आणि पोलिस पुढे निघून गेले की, घोळके च्या घोळके पुन्हा रस्त्यावर यायचे,आणि हुल्लड बाजी करायचे, असे प्रकार या भागात घडत आहेत. पोलिस यंत्रणा सतर्क राहून आणि जीव धोक्यात घालून काम करत असताना, या तरुण आणि हुल्लडबाज लोकांना कोण घडविणार असा प्रश्न निर्माण झालाआहे.

सम्राट चौक परिसर, न्यु बुधवार पेठ चा भाग, आणि कस्तुरबा मार्केट आणि मार्केट चा परिसर, आणि बाळीवेस,रुपभवानी मंदिर रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उध्यान, या परिसरात मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी करून वारंवार घराबाहेर असणाऱ्या या तरुण मुलांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.

येथील कस्तुरबा मार्केट मध्ये तर भाजी खरेदी करण्याच्या नावाखाली विनाकारण गर्दी केली जात आहे आणि सोशल डिस्टन्स पाळलाचा नियम जात नाही. भाजी मार्केट आणि किराणा दुकाने२४ तास खुली ठेवण्याचे आदेश असतानाही किराणा दुकांनांवर आणि कस्तुरबा मार्केट मध्ये गर्दी केली जात आहे. येथील भाजी विक्रेत्यांवर ही कारवाई होणे गरजेचे झाले आहे.