Coronavirus Lockdown : आता CCTV आणि ड्रोनव्दारे रस्त्यांवर फिरणार्‍यांवर देखरेख, 333 जणांवर कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन –  संचारबंदी काळात आता पोलीस रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्या व्यक्तीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनद्वारे नजर ठेवणार आहेत. विनाकारण रस्त्यावर फिरत असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान आता परीयंत 333 जणांवर 188 नुसार कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शहरात संचारबंदी आणि वाहतूक बंदी करण्यात आली आहे. तरीही अनेक नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांवर पोलिस वेगवेगळ्या माध्यमातून कारवाई करत आहेत.

मात्र, काही टवाळखोरांना पोलिसांनी काठीचा प्रसाद दिला आहे. तरीही काहीजण घरात न बसता बाहेर पडताना दिसत आहेत.

त्यामुळे पोलिसांनी आता तंत्रज्ञानाचा आधार घेतला आहे. ड्रोन आणि शहरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या आधार घेतला आहे. त्यामुळे आता या नागरिकांवर पोलीस सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे कारवाई करणार आहेत.

सध्या विनाकारण फिरणाऱ्यांचे रस्त्यावर फोटो काढून कारवाई केली जात होती. त्यानुसार गेल्या 19 मार्च पासून 333 जणांवर 188 नुसार कारवाई केली आहे.

188 सीबतच पोलीस या व्यक्तींवर नॅशनल डिजास्टर ऍक्ट खाली देखील कारवाई करणार आहेत.
अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडणाऱ्यांवर आता पुणे पोलिसांकडून कारवाई केली जाईल. त्यासाठी अगोदर पोलिसांकडून पुकारून त्याची माहिती दिली जाईल. तसेच, रस्त्यावर फिरणाऱ्याचे ड्रोनव्दारे फोटो काढून त्यांची ओळख पटवत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

त्यामुळे नागरिकांनी १४ तारखेपर्यंत अत्याआवश्यक कारणाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल.