Coronavirus Lockdown : अभिनेता सुनील ग्रोवरनं खाल्ला पोलिसांचा मार ? फोटो व्हायरल

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लोकांना बाहेर येण्यास सक्त मनाई आहे. असं असलं तरी अनेक लोक असे आहेत अजूनही घराच्या बाहेर पडताना दिसत आहेत. अनेकांना तर पोलिसांच्या लाठीचा मारही सहन करावा लागला आहे.

अनेक स्टार्स आणि मीडिया लोकांना बाहेर पडू नका असं सांगत आहेत. अशात अभिनेता सुनील ग्रोवर यानं हीच बाब काही वेगळ्या अंदाजात सांगितली आहे.

सुनील ग्रोवर यानं एक फोटो शेअर केला आहे. एका भागात तो रस्त्यावर जाताना आणि फोटोच्या दुसऱ्या भागात तो पोलिसांचा मार खाताना दिसत आहे. सोबत फोटोवर लिहलंय की, घर से निकलते ही आणि दुसऱ्या भागाच्या फोटवर लिहिलं की, कुछ दूर चलते ही. त्यानं असं सुचवलं आहे घराच्या बाहेर पडताच पोलिसांना मार खावा लागत आहे म्हणून घराच्या बाहेर पडू नका. कॅप्शनमध्ये सुनील म्हणतो, “भगवान के खातिर घर में ही रहो.”

गेल्या 24 तासांत देशात कोरोना व्हायरसची नवीन 95 प्रकरणं समोर आली आहेत. एकूण बाधित लोकांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

You might also like