Coronavirus Lockdown : लॉकडाऊन दरम्यान जिल्हयातील हालचालींवर ड्रोनव्दारे वॉच, पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांची माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या संचारबंदीत नागरिक बाहेर पडत असल्याने आता पुणे ग्रामीण पोलीस ड्रोनद्वारे जिल्ह्यावर लक्ष ठेवणार आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली आहे. त्यात बारामती, वाघोली, लोणावळा, नांदेड सिटी आणि लोणी काळभोर या भागात देखरेख करण्यात आली आहे.

देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोना आजारामुळे गेल्या पंधरा दिवसापासून राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. नागरिकांना घरा बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. मात्र, तरीही नागरिक घराबाहेर पडताना दिसून आले आहे. विनाकारण वाहने घेऊन काही तरुण फिरत आहेत. त्यामुळे पुण्यात वाहन बंदी केली. पण जिल्ह्यात केवळ संचारबंदी आहे. हे नागरिक बाहेर फिरत आहेत.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी बारामतीत जमावाने पोलिसांवर हल्ला केला. त्यात 4 अधिकाऱ्यांसोबत 9 जण जखमी झाले. नागरिक काही ऐकत नसल्याने पोलीस कारवाई करत आहेत. तर बारामतीत एका रिक्षा चालकाला कोरोना आजाराची लागण झाल्याचे देखील समोर आले आहे.

त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे.
यापुढे जिल्ह्यावर ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. 6 भाग करण्यात आले आहेत. यात नागरिक बाहेर फिरताना दिसून आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.