Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना पोलिसांची भावनिक साद, सहकार्य करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीसांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला असून, त्यात पुणेकरांना साद घालत सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. आम्हालाही कुटुंब आहे, आम्हाला सुखरूप जायचे आहे, असा संदेश यातून दिला आहे.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी करण्यात आली आहे. पुण्यात नागरिकांना वाहने रस्त्यावर आण्यास बंदी घातली आहे. तसेच विनाकारण घरातून बाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. मात्र तरीही नागरिक बाहेर पडत आहेत. त्यांच्यावर पोलिसांनी 188 नुसार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. 19 मार्चपासून कालपरियंत 333 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर वेगवेगळ्या माध्यमातून नागरिकांचे प्रभोधन करण्यात येत आहे. प्रथम लाठीचा पाठीत प्रसाद दिल्यानंतर अनेकांनी याचा धसका घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी प्रभोधन केले. पण अनेकांनी याकडे कानाडोळाच केल्याचे दिसत आहे.

आता पोलिसांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करत त्याद्वारे पुणेकरांना साद घातली आहे. मला 3 वर्षाची मुलगी आहे. घरात आजारी आहे असून, कुटुंब रोज माझी सुखरुओ यबे यासाठी वाट पाहत आहे. आमाल्हा देखील सुखरूप घरी जायचे आहे. आम्हाला सहकार्य करा आणी घरातच राहा असा संदेश यातून देण्यात आला आहे.

त्यामुळे सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भावनिक साद पुणेकरांना घरात बसवते का हे पहावे लागणार आहे.