Coronavirus Lockdown : पुण्यात ‘एप्रिल फूल’ करणं पडणार महागात, होऊ शकते 6 महिन्याची जेल

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचे संकट असताना सर्वात चुकीच्या अफवांना आणि फेक न्यूजला रोखणे अत्यंत महत्वाचे आहे. बुधवारी पहिला एप्रिल असून यादिवशी लोक ‘एप्रिल फुल’चा प्रॅन्क खेळतात. पण पुणे पोलिसांनी कोरोनाच्या संकटाला पाहता लोकांना आवाहन केले आहे की, कोरोनाबाबत कोणत्याही प्रकारची मस्करी करू नये, नाहीतर कडक कारवाई केली जाईल.

एका वृत्तसंस्थेनुसार, सोमवारी पुणे पोलिसांनी जिल्ह्यात याबाबत अधिसूचना जारी केली आहे. पोलिसांनी आपल्या अधिसूचनेत म्हटले लिहिले आहे की, सोशल मीडियावर यादरम्यान कोणत्याही प्रकारची अफवा पसरवली तर IPC कलाम १८८ अंतर्गत कारवाई केली जाईल. विशेष म्हणजे या कलमांतर्गत ६ महिने तुरुंगवास आणि १००० रु. दंड लागू शकतो.

पोलिसांनी आपल्या अधिसूचनेत लिहिले की, ‘१ एप्रिलला आपण आपले मित्र, कुटुंब आणि जवळच्या लोकांसोबत प्रॅन्क खेळत असतो. पण कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन पाहता यावेळी लोकांना आवाहन केले जात आहे कि कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नका. असे केल्यास लॉकडाऊनचे उल्लंघन केले असे मानले जाईल.’

पोलिसांकडून लोकांना कोरोनाबाबत जागरूक करण्यासाठी आणि लोकांना लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जात आहेत. मग ते सोशल मीडियावर ट्विट असो किंवा रस्त्यावर गाणे असो.

कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊन दरम्यान अनेक प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत. मागच्या काही दिवसात याबाबत चर्चा झाली की, केंद्र सरकार २१ दिवसांच्या लॉकडाऊनला वाढवू शकते, तेव्हा सरकारकडून स्पष्टीकरण दिले गेले. सरकरने म्हटले की, आतापर्यंत असा कोणताही निर्णय झालेला नाही.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like