Coronavirus Lockdown : TV वर दिसणार 90 च्या काळातील ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ !

पोलीसनामा ऑनलाईन : 24 मार्च 2020 पासून देशभरात 21 दिवसांसाठी लॉकडाऊन आहे. सर्व जनता आता 21 दिवस घरातच राहणार आहे. सध्या लोकांना मनोरंजनासाठी टीव्ही आणि इंटरनेटचाच आधार आहे. अशात प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लॉकडाऊनच्या या काळात तुन्ही पुन्हा एकदा जुन्या दिवसांचा आनंद घेऊ शकणार आहात. 90 च्या दशकातील सर्वात मोठे टीव्ही शो रामायण आणि महाभारत पुन्हा एकदा टीव्हीवर सुरू होणार आहे.

90 च्या दशकतील किड्ससोबतच सर्वांसाठी नक्कीच ही खुशखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून लोक सोशल मीडियावरून रामानंद सागर यांच्या रामायण आणि बीआर चोपडा यांच्या महाभारत शोच्या प्रसारणाची मागणी करत होते. बुधवारी प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी रामायण आणि महाभारत या शोच्या वापसीची पुष्टी केली आहे. रामायण आणि महाभारत मालिकांची लोकांमध्ये एवढी क्रेज होती लोक यातील कलाकारांना पाहून अक्षरश: अगरबत्ती लावत असत. 78 एपिसोडवाला या मालिकांचं जेव्हा प्रसारण व्हायचं तेव्हा लोक सारं काम सोड़ून टीव्ही समोर बसत असत.

प्रसार भारतीचे सीईओ शशी शेखर यांनी अलीकडेच एक ट्विटही केलं आहे. यात त्यांनी सांगितलं की, दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत प्रसारीत करण्यासाठी हक्क धारकांसोबत बोलणं सुरू आहे. सोशल मीडियावर लोक चाणाक्य, विक्रम और बेताल आणि शक्तिमान यांसारख्या मालिकाही रिपीट टेलीकास्ट करण्यासाठी मागणी करत आहेत.