Coronavirus Lockdown : ‘रामायण’नं TRP चे सर्व रेकॉर्ड तोडले, 2015 पर्यंतचा एकही शो नाही देत ‘टक्कर’

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनाला आळा घालण्यासाठी सध्या देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. 14 एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. सोशल मीडियावर चाहत्यांच्या मागणीनंतर डीडी नॅशनलवर गोल्डन एज रामायण या मालिकेचं पुन्हा प्रसारण सुरू करण्यात आलं आहे. रामानंद सागर यांच्या 90 च्या दशकातील या मालिकेनं पुन्हा एकदा आपली लोकप्रियता सिद्ध केली आहे. या शोनं ऑनएअर झाल्यानंतर टीआरपीचे सारे रेकॉर्ड तोडले आहेत.

रामायण या मालिकेच्या टीआरपीबद्दल बोलायचं झालं तर असा एकही शो दिसत नाहीये जो या मालिकेला टक्कर देत आहे. 2015 पासून जनरल एंटरटेंमेंट कॅटेगरी(सीरियल्स) च्या बाबतीत हा शो बेस्ट ठरला आहे या शोच्या टीआरपी रेटींगची माहिती डीडी नॅशनलचे सीईओ शशी शेखर यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करत सांगितलं की, “मला हे सांगताना खूप आनंद होत आहे की, दूरदर्शनवर प्रसारीत केला जाणार शो रामायण 2015 पासून तर आतापर्यंतचा सर्वाधिक टीआरपी जनरेट करणारा हिंदी जनरल एंटरटेंमेंट शो आहे.” शशी शेखर यांनी बार्कच्या हवाल्यानं ही माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर जनतेनं मागणी केल्यानंतर रामायण या मालिकेच पुन: प्रसारण सुरू झालं होतं. यानंतर आता महाभारत, शक्तीमान असे अनेक शो आहेत ज्यांचे रिपीट टेलीकास्ट सुरू झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like