Coronavirus Lockdown : ‘रामायण’ ते ‘बिग बॉस’ ! पुन्हा प्रसारीत होणार ‘हे’ 13 ‘हिट’ शो

पोलीसनामा ऑनलाईन :कोरोनामुळं सर्व शुटींग बंद आहेत. त्यामुळं टीव्ही इंडस्ट्रीही ठप्प आहे. लॉकडाऊनमुळं आता अनेक चॅनल्सवर जुन्याच मालिका पुन्हा नव्याने लावल्या जाताना दिसत आहे. जाणून घेऊयात त्या काही जुन्या मालिकांबद्दल ज्या तुम्ही टीव्हीवर पाहू शकता.

1) रामायण- ही मालिका डीडी नॅशनलवर रोज सकाळी 9 आणि रात्री 9 वाजता टेलीकास्ट केली जात आहे.

2) महाभारत- डीडी भारतीवर महाभारत हा शो पाहिला जाऊ शकतो. रोज दुपारी 12 आणि सायंकाळी 7 वाजता या मालिकांचं प्रसारण केलं जात आहे.

3) ब्योमकेश बख्शी- स्पाय थ्रिलरचा छंद असणाऱ्यांसाठी हा शो खास आहे. हा शो डीडी नॅशनलवर रोज सकाळी 11 वाजता टेलीकास्ट केला जात आहे यात रजित कपूर मुख्य भूमिकेत आहे.


4) सर्कस-शाहरुख खानचा हा फेमस टीव्ही शो आहे. रोज रात्री 8 वाजता हा शो प्रसारीत केला जात आहे.

5) फौजी- किंग खानचा आणखी एक शो आहे फौजी. हाही शो रिपीट टेलीकास्ट केला जात आहे. फौजी मालिकेतूनच त्यानं डेब्यू केला होता.

6) कॉमेडी नाईट्स विद कपिल- कलर्सवर पुन्हा एकदा हा शो प्रसारीत केला जात आहे. शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 6.30 वाजता तुम्ही या शोचा आनंद घेऊ शकता.

7) दिल से दिल तक- रश्मी देसाईची ही मालिका कलर्सवर सायंकाळी 6 वाजता दाखवली जाणर आहे. रश्मीचे 2 शो रिपीट टेलीकास्ट होत आहेत.

8) बिग बॉस 13- बिग बॉस चा 13 वा सीजन रात्री 10 वाजता रिपीट टेलीकास्ट केला जाणार आहे.

9) कसम से- प्राची देसाई आणि राम कपूर यांचा हिट शो पुन्हा प्रासरीत केला जात आहे.

10) बेलनवाली बहू- क्रिस्टल डिसूजाचा हा शो रिपीट टेलीकास्ट केला जाणार आहे.

11) ब्रह्मराक्षस- क्रिस्टल डिसूजाचा हा आणखी एक शो आहे जो रिपीट होत आहे.

12) पवित्र रिश्ता- सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा एव्हरग्रीन शो पुन्हा प्रसारीत केला जाणार आहे. चाहते अर्चना आणि मावन यांच्या सुंदर लव स्टोरीचा पुन्हा आस्वाद घेऊ शकतील.

13) महाकाली- पूजा शर्मा आणि सौरभ राजन यांची प्रमुख भूमिका असणारा हा शोदेखील पुन्हा प्रसारीत केला जाणार आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like