Corona Lockdown : जगभरातील ‘कोरोना’च्या रूग्णांचा रिकव्हरी रेट सुधारतोय, भारत उचलणार ‘हे’ पाऊल ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत असून एकूण रूग्णांची संख्या २१ हजारांच्या पुढे गेली आहे आणि आतापर्यंत मृतांचा आकडा ७०० च्या जवळपास पोहोचला आहे. २५ मार्चपासून भारतात देशव्यापी लॉकडाऊन सुरू आहे, जे १४ एप्रिल रोजी संपणार होते. पण परिस्थिती लक्षात घेत सरकारने ३ मे पर्यंत मुदत वाढवली आहे.

३ मे पर्यंत भारत ४० दिवसांचा लॉकडाऊन पूर्ण करणार असून आता प्रश्न असा आहे की आता पुढे काय? भारतातील रूग्णांचा रिकव्हरी दर सुमारे २० टक्के आहे. आता भारतात लॉकडाऊन वाढवला जाईल कि हटवला जाईल? हे कोरोना रुग्णांच्या रिकव्हरी दरावर, संक्रमण वाढण्याचा दर आणि इतर अनेक घटकांवर अवलंबून असेल.

ऑस्ट्रेलियाने कसे रोखले संक्रमण?
ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाची प्रकरणे समोर येताच १५ मार्च रोजी त्यांनी लोकांना क्वारंटाइन केले. २० मार्च रोजी सीमा बंद केल्या. लॉकडाऊनचा पहिला टप्पा २३ मार्चपासून लागू झाला. दुसरा टप्पा २६ मार्चपासून, त्यानंतर ३१ मार्च रोजी तिसरा टप्पा लागू झाला.

हळूहळू ऑस्ट्रेलियामध्ये नवीन प्रकरणे समोर येण्याची गती कमी झाली. २२ एप्रिल रोजी केवळ १२ नवीन प्रकरणे समोर आली. याकडे लॉकडाऊनचा परिणाम म्हणून पाहिले जाते. याने स्पष्ट होते की लॉकडाऊन कालावधी वाढवल्याने कोरोनाची प्रकरणे बर्‍याच देशांमध्ये कमी झाली आहेत.

हे आहेत वेगवेगळ्या देशांचे आकडे
इटलीच्या लोम्बार्डीमध्ये लॉकडाऊन ५७ दिवसांचे आहे, २९ टक्के रिकव्हरी दर आहे. चीनच्या वुहानमध्ये ७७ दिवस लॉकडाऊन होते आणि रिकव्हरी दर ९३ टक्के होता. स्पेनमध्ये ५७ दिवस लॉकडाऊन होते आणि रिकव्हरी दर ४१ टक्के होता. तसेच फ्रान्समध्ये ५६ दिवसांच्या लॉकडाऊनने रिकव्हरी दर २५ टक्के होता आणि भारतात ४० दिवसांच्या लॉकडाऊनने रिकव्हरी दर २० टक्के आहे.

लॉकडाऊन केल्याने रिकव्हरी दर वाढला
सिंगापूरमधील एक उदाहरण आहे. सुरुवातीला लॉकडाऊन लागू केल्यानंतर त्यात ढील दिली गेली होती, पण सिंगापूरला कोरोना संक्रमणाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला आणि त्यानंतर चार आठवड्यांसाठी आंशिक लॉकडाऊन लागू केले गेले. एका सर्वेक्षणानुसार, ज्या देशांमध्ये अधिक काळ लॉकडाऊन होते तेथे रिकव्हरी दर चांगला आहे.

“भारतात १० आठवड्यांचा लॉकडाऊन आवश्यक”
भारताला किती दिवस लॉकडाउनची आवश्यकता आहे? याबाबत लेसेन्टचे मुख्य संपादक रिचर्ड हॉर्टन यांनी १० आठवड्यांचा लॉकडाऊन आवश्यक असल्याचे सुचवले. असे झाल्यास जूनमधील पहिल्या आठवड्यापर्यंत भारतातील लॉकडाऊन वाढेल.