Coronavirus Lockdown : ऋषी कपूरनं केली आणीबाणी जाहीर करण्याची मागणी, लोकं संतापून म्हणाले – ‘तुम्हा श्रीमंतांना काय फरक पडतो ?’

पोलीसनामा ऑनलाईन :सध्या देशात 21 दिवस म्हणजे 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सामान्यांसोबत सेलेब्सही आपापलं मत मांडताना दिसत आहेत. अशातच आता बॉलिवूड सुपरस्टार ऋषी कपूर यांनी आणीबाणी जाहीर करण्याची घोषणा केली आहे. ऋषी सोशलवर नेहमीच सक्रिय असतात. ऋषी यांनी ट्विट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. परंतु यानंतर मात्र ऋषी कपूर ट्रोल होताना दिसत आहेत.

ऋषी कपूर ट्विट करत म्हणाले, “प्रिय भारतीयांनो, आपण आणीबाणी जाहीर करायला हवी. पहा पूर्ण देशात काय होत आहे. जर टीव्हीवर विश्वास ठेवत असाल तर पहा दिसतंय की, लोक पोलीस आणि मेडिकल स्टाफला मारहाण करत आहेत. देशातील अवस्थेवर नियंत्रण मिळवण्याचा आणखी कोणताच मार्ग नाहीये. एकच मार्ग आहे जो आपल्यासाठी चांगला आहे. भीती आपल्या घराच्या आतच आहे.”

ऋषी कपूर यांच्या या ट्विटनंतर लोक त्यांच्यावर नाराज झाले आहेत. ऋषीच्या ट्विटवर कमेंट करत लोक आपली भडास काढताना दिसत आहेत. एका युजरनं म्हटलं की, “तुमच्यासारख्या श्रीमंतांना यानं काय फरक पडणार आहे. आणीबाणी घोषित करणं म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यातली गोष्ट आहे का. याचा मध्यमवर्गीय लोकांवर काय परिणाम होईल. यानंतर आणखी एकानं कमेंट केली की, जर तुम्हाला गरीबांची एवढीच काळजी असेल तर मला हे सांगा की तुम्ही गरिबांसाठी किती पैसे डोनेट केले आहेत. इतरही अनेक नेटकरी त्यांच्या पद्धतीनं या ट्विटवर व्यक्त होताना दिसत आहेत.