महाराष्ट्र सरकारची ‘फिल्म-टीव्ही’च्या शुटींगला परवानगी, फॉलो कराव्या लागणार ‘या’ गाईडलाईन्स ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसमुळं मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. फिल्मी आणि टीव्ही इंडस्ट्रीला तर टाळचं लागलं होतं. आता महाराष्ट्र सरकारनं मात्र गाईडलाईन्ससोबत शुटींगला परवागनी दिली आहे.

सुरू होणार फिल्म आणि टीव्हीची शुटींग
नव्या गाईडलाईन्सनुसार, कोणताही 65 वर्षांहून अधिक वयाचा व्यक्ती, गर्भवती महिला, अ‍ॅक्टर्स किंवा स्टाफचे पार्टनर आदी लोक सेटवर नसतील. प्रत्येक सिनेमाच्या सेटवर डॉक्टर्स, नर्स आणि अ‍ॅम्ब्युलन्स असणं गरजेचं आहे. जर कोणाला कोरोना झालाय असं कळालं तर त्याच्यावर तातडीनं उपचार व्हायला हवेत.

सेटवर कोणालाही हात मिळवण्याची किंवा किस करत, गळाभेट घेत हॅलो करण्याची मनाई आहे. दुसऱ्यांचा मेकअप वापरण्याची परवानगी नाही. खराब झालेल्या कपड्यांची रोजच्या रोज स्वच्छता होणं गरजेचं आहे. सेटवर युज होणाऱ्या समानातही कपात करण्यास सांगण्यात आलं आहे.

एका टेंटमध्ये फक्त 5 लोक राहू शकतात. फिल्म किंवा सिनेमातील मोठे सीक्वेंस जसं की, लग्न वगैरेची शुटींग करण्यास मनाई आहे. सर्वांना सोशल डिस्टेंसिंगचं सक्तीन पालन करणं गरजेचं आहे.

कोणत्याही सेटवर केवळ 33 टक्के स्टाफच वापरण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक सदस्य सेटवर एन्ट्री करण्याआधी आपले हाथ पाणी आण साबणानं स्वच्छ धुवेल. ट्रॅव्हल करताना घातलेले कपडे सेटवर गेल्यावर बदलावे लागणार. प्रत्येक सदस्य नवीन आणि साफ कपडे घालून काम करेन. स्टाफमधील सदस्यांनी आपले शुज आणि चप्पल काढणं गरजेचं आहे. त्यांना नवीन फूटवेअर आणि मोजे घालावे लागतील. हे सगळं ते आपल्या घरून घेऊन जातील.

गाईडलाईन्सनुसार, जर शक्य झालं तर कास्टींग, लुक टेस्ट आणि मीटींग हे व्हिडीओ कॉल, व्हिडिओ कॉन्फरंस, फेसटाईप व स्काईपच्या मदतीनं कराव्यात. आर्टीस्टनं घरूनच तयार होऊन जाण्याचा प्रयत्न करावा. सेटवर जास्त स्टाफ ठेवण्यास परवानगी नाही. फारतर अॅक्टर आपल्यासोबत एक स्टाफ मेंबर घेऊन येऊ शकतात जे हेअर आणि मेकअप असं दोन्हीही करेल. प्रत्येक प्रकारच्या फिटींगचं कामही अ‍ॅक्टर्सना घरीच करण्यासाठी सांगण्यात आलं होतं.

आर्टीस्टनं घरूनच जेवण न्यावं असा सल्ला देण्यात आला आहे. सेटवर कमीत क्मी ज्युनियर आर्टीस्ट असावेत. आता सदस्य त्यांचं ओळखपत्र घेऊन जातील. तसेच त्यांना सेट्सपर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल आणि आयडी देखील दाखवावा लागेल.

मेकअप आर्टीस्टला घालावं लागेल PPE किट
अ‍ॅक्टर्सला स्वत:लाच काही कॉस्ट्युम्स आणावे लागतील जे ते शुट्सवर घालू शकतील. प्रिंटींगच्या ठिकणी सॅनिटायजर असणं गरजेचं आहे. स्क्रिप्ट किंवा इतर कोणतीही कॉपी कमीत कमीत लोकांकडून हातातळी जावी. टॅलेंट आणि मेकअप आर्टीस्टला आपल्या सेशनआधी आणि नंतर आपले हात धुणं गरजेचं आहे.

प्रत्येक अ‍ॅक्टरनं वेगळा मेकअप ब्रश, हेअर ब्रश आणि कंगवा वापरावा. यांचही सॅनिटायजेशन होणं गरजेचं आहे. हेअर आणि मेकअप करताना आर्टीस्टनं PPE घालणं गरजेचं आहे. यामुळं वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात येऊनही ते सुरक्षित राहतील. अ‍ॅक्टर्सनं स्वत:च हेअर स्टाईल केली तर चांगलं राहिल.

हेअर आणि मेकअप आर्टीस्टनं फेस शिल्ड घालणं गरजेचं आहे. नाही तर हेअर आणि मेकअप स्टेशनमध्ये 6 फुटाचं अंतर ठेवणं गरजेचं आहे. मेकअपच्या वेळी डिस्पोजेबल किटचा वापर केला जावा. म्हणजे एकदा वापर झाल्यानंतर तो फेकून देता येईल आणि प्रत्येक वेळी नवीन किटचा वापर करता येईल.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like