Coronavirus Lockdown : सोसायट्यांकडून सोशल डिस्टन्सींग अन् परिसर निर्जंतुकीकरण मोहिम

पुणे : पोलीसनामा ऑनालाइन – कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. भारतात आतापर्यंत 30 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश आहे. पुण्यात देखील आज (सोमवार) दुपारी एका 52 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळं खासगी रूग्णालयात मृत्यू झाला आहे. त्याच पार्श्वभुमीवर पुण्यातील सर्व सोसायटयांमध्ये सोशल डिस्टन्सींग पाळताना दिसून येते.आंबेगाव येथील ब्ल्यू स्प्रिंग सोसायटीमध्ये नागरिकांनी थेट शेतकर्‍यांकडून भाजीपाला आणि फळे घेण्यास सुरवात केली आहे.

सोसायटीमध्ये संपुर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. संपुर्ण देशभर 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य जनतेवर पडताना दिसून येत आहे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू देखील खरेदी करण्यात अडचणी येत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like