एकही मजुराकडून भाडे न घेता मोफत बस सेवा, ‘कोविड’ निधी देऊन विवाह सोहळा पार पडला

मुरबाड  : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाच्या वाढत्या धोक्याने लग्न सोहळ्यांवर संक्रात आणली असली तरी मोठ्या प्रमाणात होणार खर्च ही आटोक्यात आणला आहे. मात्र मुरबाड तालुक्यातील अशाच एक दिवसीय विवाहाने तालुक्यात आदर्श निर्माण केला असल्याची चर्चा आहे.

जेष्ठ पत्रकार मुरलीधर दळवी यांचा मुलगा मयुर व केशव हंडोरे यांची कन्या अश्विनी यांचा विवाह सोहळा मार्च महिन्यात आयोजित केला होता. दोन्ही उभयतांचा मोठा गोतावळा असल्याने मोठ्या प्रमाणात आप्तेष्ट, मित्रमंडळी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार होते. मात्र सद्याची परिस्थिती लक्षात घेऊन सदर भव्य कार्य रद्द करून घरगुती स्वरूपात करण्यात आले. तर या लग्ना निमित्ताने कोविड निधी देऊन विवाह सोहळा पारपडला.या वेळी मुख्यमंत्री सहाय्यता कोविड १९ ला निधी देऊन आम्हला एक वेगळाच आनंद झाल्याचे मयूर दळवी यांनी सांगितले.

तर मुरबाड मध्ये आंबेडकर जयंती घरातच साजरी करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्‍युलर लोकनेते दिलीप चंदने सेवाभावी संस्था व आर.सी. सिंबोल ऑफ युनिटी यांच्यावतीने दहा हजार,सुजल साईनाथ शिंदे याचा चौदावा वाढदिवसा निमित्ताने वडील साईनाथ शिंदे व काका मयुर शिंदे यांनी पंचवीस हजार निधी,आधार फाउंडेशन पंचवीस हजाराचा निधी,अशोक भोईर यांनी आपल्या मुलीच्या लग्ना निमित्ताने एकविस हजाराचा निधी,दै सकाळचे जेष्ठ पत्रकार मुरलीधर दळवी यांनी आपल्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने अकरा हजाराचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ ला दिला मुरबाड मधून लॉकडाऊन च्या 55 दिवसांमध्ये मुरबाड तहसील मध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ ला अत्ता पर्यंत ब्यानो हजाराचा निधी जमा झाल्याचे तहसीलदार अमोल कदम यांनी सांगितले तर या विवाहाने तालुक्यात नवा आदर्श घातला जाईल असे तहसिलदारा अमोल कदम यांनी अश्या व्यक्त केली.

तर मुरबाड मधील राम दळवी वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष एक ही दिवस नचूकता आपल्या माय घरी परतण्या साठी निघालेल्या पाई चालणाऱ्या कामगारांना अगखंड अन्न,पाणी,त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था करून सेवा देत आहेत जणू काही या कामगारांना देवदूतच मिळाला आहे आपल्या गाडी मध्ये दररोज नित्य नियमाने अन्न घेऊन जिथे माहीत पडेल त्या ठिकाणी अन्न सुविधा करत आहेत त्याच्या पासेस ची व्यवस्ता ते त्यांना गाडी मध्ये एक वेळचे जेवण,पाणी देऊन गेली कित्येक दिवस सेवा करत आहेत.

मुरबाड आगारा मधून बिजापूर पर्यंत बस सेवा ही दि 11 मे पासून आजपर्यंत तब्बल 23 बस सोडल्या असल्याचे मुरबाड आगरप्रमुख अमर पंडीत यांनी सांगितले तर एकही मजुरा कडून भाडे न घेता मोफत बस सेवा देत आहे या वेळी मुरबाड माजी नगराध्यक्षा शीतळ तोंडाळीकर यांनी 22 कामगारांना पास ची सुविधा करून त्याची जाण्याची व्यवस्था तर रामभाऊ दळवी यांनी त्यांना जेवणाची सोय करून निरोप दिला या वेळी कामगारांनी बस चालक,आगर प्रमुख,माजी नगराध्यक्षा शीतल तोंडळीकर,वारकरी संप्रदयाचे अध्यक्ष रामभाऊ दळवी यांचे आभार मानले.