Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील ‘ही’ ठिकाणे होणार ‘सील’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूमुळे पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, रुणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील चार परिसरांचा भाग आज बुधवार, दि.०८ एप्रिल, २०२० रोजी मध्यरात्री बारा वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत ‘सील’ करण्यात निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.

१. घरकुल रेसीडेन्सी बिल्डींग क्र.ए १ ते २० चिखली,
(पवार इंडीस्ट्रीयल परीसर-नेवाळे वस्ती)

२. जामा मस्जिद, खराळवाडी या भोवतीचा परीसर, पिंपरी (गिरमे हॉस्पीटल-अग्रेसन लायब्ररी-क्रिश्ना ट्रेडर्स-चैताली पार्क हौसिंग सोसायटी-खराळआई गार्डन-ओम हॉस्पीटल-ओरीयंटल बँक-सीटी प्राईड हॉटेल-क्रिस्टल कोर्ट हॉटेल-गिरमे हॉस्पीटल)

३. कमलराज बालाजी रेसीडन्सी, रोडे हॉस्पीटल जवळ, दिघी, भोसरी (रोडे हॉस्पीटल-एसव्हीएस कॉम्प्युटर-स्वरा गिप्ट शॉपी-साई मंदीर रोड-अनुष्का ऑप्टीकल शॉप-रोडे हॉस्पीटल)

४. शिवतीर्थ नगर, पडवळनगर थेरगाव (शिरोळे क्लिनिक-गणेश मंदीर-निदान क्लिनिक-किर्ती मेडीकल-रेहमानिया मस्जिद-ऑर्कीड हॉस्पीटल-अशोका सोसायटी रोडवरील गणपती मंदीर ते शिरोळे क्लिनिक)

त्यानुसार वरील परिसरांच्या हद्दींमध्ये पुढील आदेशापर्यंत प्रवेशबंदी व परिसरातून बाहेर पडण्यास नागरिकांना बंदी करण्यात येत आहे. सील केलेल्या परिसरातील प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क अथवा घरगुती स्वच्छ धुतलेला कापडी रुमाल लावणे बंधनकारक करण्यात येत आहे. तसेच आदेशामधील निर्बंधातून जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याऱ्या व्यक्तींना, कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कर्मचारी व वाहने व शासकीय व सेवा देण्यात येणाऱ्या वाहनांना वगळण्यात येत आहेत. तरी नागरिकांना सहकार्य करावे या करीता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीन आवाहन करण्यात आले आहे.

जागतिक आरोग्य संघटना तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांनी या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव प्रस्तावित केलेल्या विविध उपाय योजनांची अंमलबजावणी या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणास्तव पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्याची व त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

अधिसूचना सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई ४००००१ दि.१४ मार्च २०२० क्र करोना २०२०/प्र.क्र.५८/आरोग्य ५ अन्वये ५ “महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम,२०२०” नुसार क्षेत्र प्रतिबंधित करणेअ) क्षेत्र प्रतिबंधित करणेआ) क्षेत्रातील नागरिकांचे आगमन व प्रस्थान प्रतिबंधित करणेइ) क्षेत्रातून वाहनांचे आवागमन प्रतिबंधित करणेतसेच भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ प्रमाणे संभाव्य होणाऱ्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मानवी आरोग्याला व जीविताला धोका निर्माण होण्याचा संभव आहे. याकरीता कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाच्या प्रतिबंध व नियंत्रण याबाबतचे आदेश लागू करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. तरी साथरोग नियंत्रण अधिनियम १८९७ (एपिडमिक ऍक्ट) मधील तरतुदींनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील खालील नमुद परीसर सील करणे आवश्यक आहे.

कोरोना विषाणूमुळे पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. शहरातील कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या विचारात घेता, रुणांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांचे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने शहरातील चार परिसरांचा भाग आज बुधवार, दि.०८ एप्रिल, २०२० रोजी मध्यरात्री बारा वाजलेपासून पुढील आदेशापर्यंत ‘सील’ करण्यात निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला आहे.