Coronavirus Lockdown : सरकारकडून ‘या’ 3 कोटी खातेदारांना 3 महिन्यांची पेंशन ‘अ‍ॅडव्हान्स’

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात सुमारे तीन कोटी विधवा, वृद्ध आणि दिव्यांगांना तीन महिन्यांची पेन्शन अ‍ॅडव्हान्स देण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रमांतर्गत थेट त्यांच्या खात्यात अ‍ॅडव्हान्स पेंशन देण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले.

60-79 वर्ष वयोगटातील वृद्धांना आता दरमहा 200 रुपये, तर 80 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या वृद्धांना दरमहा 500 रुपये मिळतात. त्याचबरोबर 40 ते 79 वर्ष वयोगटातील विधवांना दरमहा 300 रुपये दिले जातात, तर 80 वर्षांवरील विधवांना दरमहा 500 रुपये मिळतात. 79 वर्षांपर्यंतच्या दिव्यांगांना दरमहा 300 रुपये दिले जातात, तर 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांना दरमहा 500 रुपये दिले जातात.

मनरेगा कामगारांचे वेतन 10 एप्रिलपर्यंत देण्यात येणार आहे

मनरेगा कामगारांचे संपूर्ण वेतन 10 एप्रिलपर्यंत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे वेतन 11,499 कोटी रुपये आहे. त्याचबरोबर 2019 मध्ये आठ राज्यांमधील पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, दुष्काळ यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 5,751 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मदतीस मान्यता देण्यात आली आहे.