अम्फान : पंतप्रधान पश्चिम बंगाल-ओडिशाचा दौऱ्यावर, 83 दिवसांनंतर दिल्लीबाहेर पडणार PM नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : बुधवारी पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये अम्फान वादळाने धडक दिली होती. 160 ते 180 किलोमीटर प्रति तास वेगाच्या अम्फान वादळाने पश्चिम बंगाल आणि ओडिसात मोठा विध्वंस केला आहे. पश्चिम बंगालमध्ये 283 वर्षांनंतर असे भयंकर वादळ आले आहे. एका अंदाजानुसार या राज्यात वादळामुळे सुमारे एक लाख करोड रूपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

दरम्या, पीएम मोदी आज वादळाने प्रभावित पश्चिम बंगाल आणि ओडिसाचा दौरा करणार आहेत. पीएम मोदी 83 दिवसांनंतर प्रथमच दिल्लीच्या बाहेर जात आहेत. देशात कोरोनाच्या संसर्गाला ब्रेक लावण्यासाठी 25 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन लागू आहे. पीएम मोदी हे या काळात दिल्लीच्या बाहेर गेलेले नाहीत. तसेच लॉकडाऊनच्या काही दिवस आधी सुद्धा पीएम मोदी यांनी दिल्लीच्या बाहेर दौरा केला नव्हता. त्यामुळे हा दौरा तब्बल 83 दिवसांनंतर केला जात आहे.

हवाई सर्वेत ममताही असतील सोबत

पंतप्रधान नरेंद्र मोदी अम्फान वदळाने प्रभावित पश्चिम बंगाल आणि ओडिसाचा दौरा करतील. अम्फानमुळे राज्याच्या दक्षिणी भागातील नुकसानीचे पाहणी करण्यासाठी मोदीश शुक्रवारी बंगालला जातील. पंतप्रधान मोदी सकाळी 10.30 वाजता कोलकाता एयरपोर्टवर पोहचतील. त्यानंतर पीएम मोदी आणि ममता बॅनर्जी कोलकातासह उत्तर आणि दक्षिण 24 भागाचा हवाई दौरा करतील.

अम्फान वादळाने ओडिसात सुद्धा नुकसान केले आहे. मात्र बंगालपेक्षा तेथे नुकसान कमी आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटनुसार पीएम मोदी ओडिसामध्ये झालेल्या नुकसानीचा देखील हवाई आढावा घेतील.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी यांनी गुरूवारी सायंकाळी आपल्या पत्रकार परिषदेत पीएम मोदी यांनी राज्याचा दौरा करावा, असे आवाहन केले होते. या आवाहानाच्या काही तासातच पीएम मोदी यांनी दौरा करण्याचा निर्णय घेतला.

ममता बनर्जी यांनी गुरुवार पत्रकार परिषदेत म्हटले की, राज्यात स्थिती ठीक नाही. मी पीएम मोदींकडे मागणी करते की, त्यांनी येथील दौरा करावा. मीसुद्धा हवाई सर्वेक्षण करेन. परंतु, मी स्थिती सुधारण्याची वाट पाहात आहे.

असा आहे मोदींचा पूर्ण कार्यक्रम

– सकाळी 10 वाजात पीएम कोलकाता एयरपोर्टवर पोहचतील

– यानंतर 10.45 वाजता दमदम एयरपोर्टवर पोहचतील

– सीएम ममता बनर्जी यांच्यासोबत चॉपरने बशीरहाट जातील

– 11.20 वाजता वादळाने प्रभावित क्षेत्राचा हवाई सर्वे करतील

– 1.30 वाजता पीएम भुवनेश्वरसाठी रवाना होतील

कोलकातामध्ये विध्वंस

वादळामुळे कोलकातामध्ये अनेक भागात पाणी भरले आहे. याचा परिणाम कोलकाता एयरपोर्टवर सुद्धा दिसत आहे. येथे चारी बाजूला पाणी भरले आहे. 6 तासात या वादळाने कोलकाता एयरपोर्टचे नुकसान केले आहे. सर्वत्र पाणी भरले आहे. रनवे आणि हँगर पाण्यात बुडाले आहेत. एयरपोर्टच्या भागात तर अनेक इन्फास्ट्रक्चर पाण्यात बुडाले आहेत. अम्फानचा सर्वात जास्त प्रकोप पश्चिम बंगालच्या उत्तर 24 क्षेत्र, दक्षिणी 24 क्षेत्र, मिदनापुर आणि कोलकातामध्ये झाला आहे.