IPS अधिकारी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांना ‘कोरोना’ची लागण

प्रयागराज : वृत्तसंस्था – प्रयागराज येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. योगी सरकारने काल (सोमवार) रात्री त्यांची बदली केली होती. पंकज यांना प्रतिक्षा यादीमध्ये ठेवण्यात आले आहे. सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी नुकताच शिक्षक भरती घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता.

कोरोना विषाणूची लागण झाल्याच्या संशयावरून पंकज यांना आज (मंगळवार) स्वरुप राणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नोडल अधिकारी (कोविड 19) डॉक्टर ऋषी सहाय यांनी सांगितले की, वरिष्ठ पोलीस अधीक्षकांचा एक कर्मचारी कोरोना संसर्गित झाला आहे. त्यानंतर ते संक्रमित झाले असल्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, सोमवारी रात्री उशिरा राज्य सरकारने वरिष्ठ पोलीस अधीक्षक सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांची बदली केली असून त्यांना प्रतीक्षेत यादीत ठेवण्यात आले आहे. त्यांच्या जागी पीलीभीत पोलीस अधीक्षक अभिषेक दीक्षित यांना प्रयागराजचे नवीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. सहाय यांनी सांगितले की, पंकज यांचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे.

उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील या धोकादायक विषाणूमुळे मृत्यू झाल्याची ही पहिलीच घटना आहे. ही महिला ठाणे भवन इमारत परिसरातील रहिवासी असून तिचा सोमवारी मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात आणखी एका महिलेला कोरोनाची लागण झाली असून सध्या संक्रमित लोकांची संख्या 49 झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

शामली जिल्हा दंडाधिकारी जसजित कौर यांनी सांगितेल की, महिलेला मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले होते. तिचा सोमवारी मृत्यू झाला. शामलीमध्ये कोरोनामुळे रुग्णाची मृत्यू होण्याची पहिलीच घटना आहे. जिल्ह्यात काल संध्याकाळी एका महिलेला कोरोनाची लागण झाल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 49 इतकी झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात 10 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

राज्यातील 14 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
उत्तर प्रदेश सरकारने राज्यातील 14 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. कानपूर येथील आनंत देव यांना एसटीएफ लखनौचे पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. आनंत देव यांच्या जागी सहारनपुर येथे तैनात असलेले दिनेश कुमार पी यांना कानपुरचे पोलीस अधीक्षक पदी नियुक्त करण्यात आले आहे. शाहजहांपूरचे पोलीस अधीक्षक एस. चनप्पा यांना सहारनपुर येथे नियुक्त करण्यात आले आहे. गुन्हे मुख्यालयाचे महानिदेशक एस आनंदला यांची शाहजहांपुरचे पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.