Coronavirus : लोणीकंद पोलिसांची 325 जणांवर दंडात्मक कारवाई

थेऊर : पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना संसर्गाचा वाढता प्रभाव लक्षात घेता यावर वेळीच प्रतिबंध करण्यासाठी लोणीकंद पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईस सुरुवात केली असून गेली चार दिवसांत ३२५ नागरिकांवर मास्क वापरत नसल्याने दंडात्मक कारवाई केली तर ८ हॉटेलवर सामाजिक अंतर राखले नसल्याने प्रत्येकी रु.२५०० ची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोरोनाचे रुग्ण गेल्या काही दिवसांपासून वाढताना दिसत आहेत या पार्श्वभूमीवर शासनाने अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजना आखल्या आहेत.नागरिकातील बेजबाबदारपणा कोरोनाच्या फैलाव होण्यास पोषक होत आहे.गर्दीच्या ठिकाणी आणखी सुरक्षेची नियमावली पाळली जात नाही त्यामुळे पोलिसांना दंडात्मक कारवाई करावी लागते. लोणीकंद पोलीस स्टेशन कायमच कार्यात अग्रेसर असल्याने पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी आपल्या सहकाऱ्यांना नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाईचे आदेश दिले त्यावर लोणीकंद पोलिस हरकतीत आले आहेत.

पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, कोणीही विना मास्क फिरू नये, सोशल डीस्टसिंगचा भंग करू नये तसेच हॉटेल्स/धाबे, मंगल कार्यालये, चहाचे दुकान या ठिकाणी विनाकारण गर्दी करू नये. असे कोणीही व्यक्ती आढळून आल्यास त्यांचेवर दंडात्मक कडक कारवाई तसेच वेळप्रसंगी गुन्हे देखील दाखल करण्यात येणार आहेत.