‘कोरोना’च्या काळात कसा होणार कपलमधील ‘रोमँस’ ? अपारशक्ति खुरानानं फोटो शेअर करत दिलं उत्तर !

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  कोरोनाच्या काळात फिल्म आणि टीव्हीची शुटींग तर सुरू झाली आहे. परंतु आता रोमँटीक आणि प्रेमाचे सीन कसे शुट केले जातील हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. अभिनेता अपारशक्ति खुराना यानं नव्या सिनेमातील एका सीनचा फोटो शेअर करत कोरोनाच्या काळातील बदल दाखवून दिला आहे.

अपारशक्तिनं सांगितलं कोरोनाच्या काळात कसं होणार प्रेम ?
अपारशक्ति खुरानाचा हेल्मेट हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रनुतन बहल दिसणार आहे. कोरोनाच्या काळात रोमँटीक सीन कसे दिसतील हे अपारशक्तिनं सांगितलं आहे. अपारशक्तिनं एक फोटो शेअऱ केला आहे ज्यात तो आणि प्रनुतन रोमँस करताना दिसत आहेत. आता इथंच ट्विस्ट आहे. अपारशक्तिनं आणखी एक फोटो शेअर केला आहे. फोटो तर सेम तोच आहे फक्त यात अपारशक्ति आणि प्रनुतन यांच्या चेहऱ्यावर फेस शील्ड दिसत आहे.

हा फनी फोटो शेअर करत अपारशक्तिनं लिहिलं आहे की, बरं झालं की, सिनेमातील हा सीन कोरोना येण्याच्या आधीच शुट केला आहे. जर हा सीन आजच्या टाईममधला असता तर आम्हाला प्रोटेक्शनची गरज पडली असती. हेही सांगतो की, प्रोटेक्शनचा अर्थ आहे मास्क. तुम्ही पण लगेच काय विचार करायला लागलात ना.

हेल्मेट सिनेमाचा प्रोमो-

अपारशक्तीची ही क्रिएटीविटी पाहिल्यानंतर प्रत्येकजण हसण्यासाठी मजबूर झाला आहे. प्रत्येकजम असाच विचार करत आहे की, रिअलमध्येही आता रोमँटीक सीन असेच शुट केले जातील.