धक्कादायक ! ‘टेस्ट’ केल्यानंतर गायब झाले 2290 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लखनऊमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गायब झाल्याचा प्रकार घडला आहे. या रुग्णांनी टेस्ट केल्यानंतर खोटे नाव, पत्ता आणि मोबाइल क्रमांक दिला होता. त्यामुळे या रुग्णांबाबत माहिती मिळणे कठिण झाले आहे. सध्या पोलीस या रुग्णांचा शोध घेत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 2290 कोरोना रुग्ण गायब झाल्याची शक्यता आहे. त्यातील1171 लोकांबाबत माहिती पोलिसांना मिळाली आहे. तर 1119 रुग्ण अजूनही बेपत्ता आहेत. 23 ते 31 जुलै दरम्यान या रुग्णांची चाचणी करण्यात आली. कोरोना टेस्ट केल्यानंतर हे रुग्ण गायब झाले. जेव्हा प्रशासनाने त्यांचे नाव आणि पत्ती यांची तपासणी केली, तेव्हा ही माहिती खोटी असल्याचे समोर आले.

पोलीस आयुक्तांनी रुग्णांना शोधण्याची जबाबदारी कोव्हिड-19 सर्व्हिंलस टीमला दिली होती.आतापर्यंत 1171 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सगळ्यांविरुद्ध चुकीची माहिती दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त सुजीत पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी रोज हजारोच्या संख्येने रुग्णांची तपासणी केली जाते. यात काही रुग्ण फॉर्मवर आपली खोटी माहित देत असल्याचे समोर आले आहे. सध्या अशा रुग्णांचा शोध घेतला जात आहे.