Coronavirus : राज्यातील ‘ही’ आकडेवारी चिंता वाढवणारी, धोका वाढतेय ?

 मुंबई  : पोलीसनामा ऑनलाइन  –  देशात कोरोनाग्रस्त रूग्णांची आकडेवारी वाढत आहे. यातच महाराष्ट्र राज्यातही इतर राज्यांच्या तुलनेत अधिक कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. हे राज्य कशा प्रकारे कोरोना नियंत्रणात आणत आहे?, कोणकोणत्या बाबी राबवत आहे?, आदी. यातच महाराष्ट्र राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देशाच्या तुलनेत कमी आहे, असे आढळून आले आहे. त्यामुळे ही आकडेवारी महाराष्ट्र राज्यासाठी चिंता वाढविणारी ठरत आहे.

देशात आतापर्यंत 7 लाख 82 हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात एकूण 1 लाख 94 हजार 253 हजार कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्र राज्यात गुरुवारी दिवसभरात 6 हजार 484 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनामुक्त होत असलेल्या रुग्णांची संख्या आता दोन लाखांवर आहे. मात्र, देशाच्या तुलनेत रुग्ण बरे होण्याची टक्केवारी राज्यात कमी आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.9 टक्के इतके आहे. हेच प्रमाण देशात 63.18 टक्के इतके आहे.

महाराष्ट्र राज्यात सध्या 1 लाख 40 हजार 92 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात दिवसभरात 9 हजार 895 रुग्ण व 298 मृत्यूंची नोंद झालीय. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 47 हजार 502 झाली आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 12 हजार 854 झाला आहे. महाराष्ट्र राज्याचा मृत्यूदर 3.7 टक्के आहे.

आज दिवसभरात नोंद झालेल्या 298 मृत्यूंमध्ये मुंबई 55, ठाणे 7, ठाणे मनपा 1, नवी मुंबई मनपा 7, कल्याण डोंबिवली मनपा 18, उल्हासनगर मनपा 8, भिवंडी निजामपूर मनपा 4, मीरा भाईंदर मनपा 2, पालघर 2, वसई विरार मनपा 23, रायगड 3, नाशिक 5, नाशिक मनपा 8, मालेगाव मनपा 2, अहमदनगर 1, धुळे मनपा 2, जळगाव 8, जळगाव मनपा 5, पुणे 19, पुणे मनपा 37, पिंपरी चिंचवड मनपा 22, सोलापूर 1, सोलापूर मनपा 2, सातारा 1, कोल्हापूर 3, कोल्हापूर मनपा 1, सांगली 2, सांगली मिरज कुपवाड 3, रत्नागिरी 2, औरंगाबाद 10, जालना 3, हिंगोली 4, परभणी मनपा 1, लातूर 5, लातूर मनपा 1, उस्मानाबाद 1, बीड 3, अकोला 1, अमरावती मनपा 2, यवतमाळ 2, नागपूर मनपा 1 आणि अन्य राज्य/ देशातील 6 रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईमध्ये आज दिवसभरात 1 हजार 245 रुग्ण तर 55 मृत्यू झाले आहेत. शहर उपनगरात 1 लाख 5 हजार 923 कोरोना बाधित असून मृतांची संख्या 5 हजार 930 वर पोहोचली आहे, तर अन्य कारणांमुळे आतापर्यंत 293 रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे.

सध्या 22 हजार 598 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 17 लाख 37 हजार 716 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 20 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8 लाख 74 हजार 267 व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत. तर, 45 हजार 222 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहेत.