Covid-19 च्या जागतिक साथीने आपल्या राज्यात घेतलेत तब्बल ‘एवढे’ बळी; आकडे बघून बसेल धक्का

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  PM मोदींनी देशव्यापी Lockdown २५ मार्चला जाहीर केला होता. आता त्याला बरोबर ९ महिने उलटले आहेत. या कालावधीत कोरोना व्हायरस (Coronavirus) चं गंभीर रूप देशासमोर आलं आहे. या जागतिक महासाथीने महाराष्ट्रात सर्वाधिक बळी घेतले आहेत. आता कोरोना व्हायरस (Coronavirus) आटोक्यात आला होता मात्र, नवीन कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे आता पुन्हा धोका वाढला आहे.

कोरोना व्हायरस (Coronavirus) आटोक्यात आला. नवीन कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे धोका वाढला, पण रिकव्हरी रेटही वाढला, कोरोना लस लवकरच येणार, महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचे रुग्ण झाले कमी, मृत्यूदर खाली आला याप्रश्नांची उत्तरे मिळण्याची वाट आपण पाहत आहोत. परंतु, वरवर दिसणारे हे दैनंदिन अपडेट किंवा आकडेवारी प्रत्यक्षात भयावह आहे. महाराष्ट्रात या जागतिक साथीने आतापर्यंत अर्धा लाख बळी घेतले आहेत.

कोरोनाचा मृत्यूदर आता राज्यात कमी झाला असल्याचं सांगितलं जातं. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या दर १०० पैकी २. ५७ लोकांचा मृत्यू होतो. प्रत्यक्षात राज्यात आतापर्यंत ४९,१२९ लोकांचा बळी या आजाराने घेतला आहे. फक्त ९ महिन्यांतली ही संख्या आहे आणि या दृष्टीने विचार केला तर मोठा आकडा आहे. टक्केवारीच्या हिशोबाने हा आकडा छोटा वाटत आहे. आणि तो लहान वाटण्यामागे राज्याचा महाकाय आकार, प्रचंड लोकसंख्या हे कारण आहे.

राज्यातल्या मोठ्या शहरांमध्ये कोरोना कहर जास्त होता. अजूनही कोरोनाची भीती मोठ्या शहरांमध्येच अधिक आहे. या शहरातल्या प्रत्येक घराने जवळचे मित्र, नातेवाईक किंवा आप्तांपैकी कुणाला तरी या साथीने गाठलेलं पाहिलेलं आहे. त्यातल्या काहींनी आप्त गमावलेही आहेत. त्यामुळे ग्राफ खाली आला म्हणून बिनधास्त होताना या गोष्टींकडेही आणि या आकड्यांकडेही डोळे उघडे ठेवून पाहायला हवे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा घसरत आहे. नव्या रुग्णांच्या संख्येतही फारशी वाढ दिसतनाही. ३ ते ४ हजारंच्या दरम्यान दररोज नवे रुग्ण आढळत आहेत. पण परिस्थिती आटोक्यात आलेली असताना या साथीने आतापर्यंत किती नुकसान केलं आहे. लॉकडाऊनमध्ये आर्थिक कंबरडं तर मोडलं आहे. कोरोनाने प्रत्येक घरात या साथीने दहशत निर्माण केली.

आतापर्यंतची आकडेवारी

राज्यातली कोरोना रुग्णांची आजपर्यंतची संख्या १९,१३,३८२

आतापर्यंतचे कोरोना बळी – ४९,१२९

एकट्या मुंबईतले कोरोना बळी – ११,०५६

गेल्या 24 तासांत राज्यात झालेले मृत्यू – ७१

आजच्या घडीला उपचाराधीन रुग्णसंख्या – ५६,८२३

गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोना निदान झालेले रुग्ण – ३,४३१

राज्याचा मृत्यूदर -२.५७%