मुंबई-पुण्यात ‘कोरोना’चे थैमान, तब्बल 4.85 लाख लोक होम ‘क्वारंटाइन’

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. राज्यातील मुंबई आणि पुणे शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. मुंबई, उपनगर आणि पुण्यात गेल्या 24 तासा सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात तब्बल 2608 रुग्ण राज्यात वाढले असून 60 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईतील 40 तर पुण्यातील 14 रुग्ण आहेत. राज्यभरात कोरोनाच्या बळींच्या संख्येने दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्य़ंत राज्यात 1577 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही देशातील सर्वात मोठी संख्या आहे.

राज्य सरकारने शनिवारी सायंकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात एकूण रुग्णांची संख्या 47 हजार 190 वर पोहचली आहेत. आतापर्यंत राज्यात 3 लाख 48 हजार 026 जणांची कोविड 19 चाचणी करण्यात आली आहे. राज्यभरात घरी विलगीकरणात असलेल्यांची संख्या 4 लाख 85 हजार 323 एवढी आहे. तर 33545 लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

राज्यात गेल्या 24 तासात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये मुंबईत 40, ठाणे, वसई विरार, सातारा, नांदेड येथे प्रत्येकी एक, सोलापूर 2 तर पुण्यात 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

You might also like