Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 22543 नवे पॉझिटिव्ह, 416 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना दुसरी चिंताजनक गोष्ट समोर आली आहे. काही दिवसांपासून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे स्पष्ट झाल्याने राज्या समोरील चिंता अधिक वाढली आहे. त्यातच मृत्यूचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात राज्यात 416 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. एका दिवसात एवढे मृत्यू होण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे. राज्यातील मृत्यू दर 2.79 टक्के आहे.

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 22 हजार 543 नवे रुग्ण आढळून आले आहे. राज्यातल्या एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10 लाख 60 हजार 308 एवढी झाली आहे. राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. राज्यातील रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण वाढले असून राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 20.18 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मागील काही दिवसांपासून कमी झाले आहे.

राज्यात गेल्या 24 तासामध्ये 11 हजार 549 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात 7 लाख 40 हजार 061 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8 टक्के इतके झाले आहे. मागील काही दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 72 टक्क्यांवर पोहचले होते. सध्या राज्यामध्ये 2 लाख 90 हजार 344 अॅटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सध्या राज्यात 16 लाख 83 हजार 770 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 37 हजार 794 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 52 लाख 53 हजार 676 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 10 लाख 60 हजार 308 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर उर्वरीत जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.