दिलासादायक ! राज्यात उच्चांकी 23 हजारांपेक्षा अधिक रुग्णांची ‘कोरोना’वर मात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरणीला लागला असून त्यात सलग काही दिवस घट झाली आहे. बुधवारी दिवसभरात उच्चांकी 23 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या 14 लाख 15 हजार 679 एवढी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 87.51 टक्के एवढा झाला आहे. गेल्या 24 तासात राज्यात 8 हजार 142 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 16 लाख 17 हजार 658 एवढी झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचेप्रमाण 19.43 एवढे आहे. याच दरम्यान राज्यात 180 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 42 हजार 633 एवढी झाली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण 2.64 इतके झाले आहे.

राज्यात एकूण करण्यात आलेल्या 83 लाख 27 हजार 493 चाचण्यांपैकी 16 लाख 17 हजार 658 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर उर्वरीत चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यामध्ये 1 लाख 58 हजार 852 रुग्ण ॲक्टीव्ह असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 24 लाख 47 हजार 292 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 23 हजार 312 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.