राज्याचा Recovery Rate 89 टक्क्यांच्या जवळ, दिवसभरात 6417 रुग्णांची भर

मुंबई : पोलीसानामा ऑनलाइन – राज्यातआज 137 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून दिवसभरात 6 हजार 417 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर 10 हजार 004 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 89 टक्क्यांच्या आणखी जवळ पोहचला असून हा खूप मोठा दिलासा ठरला आहे.

राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातलं असतानाच आता सकारात्मक बातमी समोर येत आहे. राज्यात आता झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून नवीन कोरोना बाधितांची संख्या 10 हजरांहून खाली उतरली आहे. आज दिवसभरात 6417 नीवन कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. आजही नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज 10004 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर राज्यात आजपर्यंत 14 लाख 55 हजार 107 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रिकव्हरी रेट 88.78 टक्के इतका झाला आहे.

राज्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृतांची संख्या कमी होताना दिसत आहे. आज 137 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर 2.63 टक्के इतका झाला असून राज्यात एकूण मृतांचा आकडा 43 हजार 152 इतका झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 85 लाख 48 हजार 036 चाचण्यांपैकी 16 लाख 38 हजार 961 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 19.17 टक्के आहे. सध्या राज्यात 25 लाख 3 हजार 510 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 14 हजार 170 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like